छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर “वंदे भारत” सेवेचा श्री. नरेंद्र मोदी, माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ
mumbai solapur train पंतप्रधान 10 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. वंदे भारत एक्सप्रेस गाडीची नियमित सेवेची सुरुवात खालीलप्रमाणे आहे.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस mumbai solapur vande bharat express
ट्रेन क्रमांक 22225 मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 11.2.2023 पासून दररोज (बुधवार वगळता) संध्याकाळी 04.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहोचेल.mumbai solapur vande bharat express timetable
गाडी क्रमांक 22226 सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस 11.2.2023 पासून दररोज (गुरुवार वगळता) सोलापूरहून 06.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
थांबे: दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी
गाडीची रचना: दोन एसी एक्झिक्युटिव्ह क्लास आणि 14 एसी चेअर कार
आरक्षण: ट्रेन क्र. 22225/22226 चे बुकिंग 10.2.2023 रोजी सर्व PRS काउंटरवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल.
या वंदे भारत गाड्यांच्या वेळेसाठी त्यांच्या पुनरावृत्तीच्या थांब्यावर कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
प्रवाशांना त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविडचे योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जातो.