पालकमंत्री जिल्ह्यात आणा आणि 5000 रुपये मिळवा; मनसे चे बक्षीस
नगर दि १६ एप्रिल प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.अशा स्थितीत गेल्या अनेक महिन्यापासून नगरचे पालकमंत्री गायब असून त्यांना जिल्ह्यात घेऊन आल्यास त्यांना 5000 रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात येणार असल्याचे मनसे चे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी जाहीर केले आहे.
नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत.त्यांना रेम्डीस्वीर औषध मिळत नाही,ऑक्सिजन चे बेड मिळत नाहीत .रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर उतरत आहेत .अशी परिस्थिती असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक दिवसांपासून गायब आहेत.इतर जिल्ह्याचे पालकमंत्री हे आपल्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी काम करत असताना नगरचे पालकमंत्री गायब आहेत.त्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी मनसे ने बक्षीस जाहीर केले आहे.
जिल्ह्यात दररोज तीन हजार पेशंट येत आहेत तर 30 ते 40 नागरिकांचा मृत्यू होत आहे.
यासाठी मनसे ने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची छबी असलेले स्टिकर छापले असून ते जिल्ह्यातील बस वर चिटकून टाकले जात आहे.
आणखी वाचा :डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलल्या