महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांचा अर्ज दाखल

- Advertisement -
- Advertisement -

महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांचा अर्ज दाखल

अहमदनगर।प्रतिनिधी

अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदासाठी आज शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. दि.30 रोजी ऑनलाइन पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या आवारामध्ये जय भवानी जय शिवाजी, महाविकास आघाडीचा विजय असो, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles