जे मिळालं ते भरपूर मिळालं, समाधानी रहा, उतावीळ वागू नका मराठ्यांनो आता शासक आणि प्रशासक बना
नारायण गड येथील दसरा मेळावा येथून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा समाज बांधवांना संदेश
बीड
manoj jarange patil dasara melava 2025 मराठा समाजातील गरीब लोकांसाठी मी लढाई केली आणि माझ्यासोबत गरीब मराठा समाज मोठ्या ताकतीने उभा राहिला. पहिल्या वर्षात ५८ लाख गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं दुसऱ्या वर्षात पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब मराठ्यांना समाजाचा आरक्षण ची लढाई ही आणि गरीब मराठा समाजांनी जिंकली आहे. जे मिळाले आहे ते भरपूर मिळाला आहे, समाधानी रहा उतावळी वागू नका, थोडं हुशार आणि चला मराठ्यांच्या मुलांनी यापुढे शासक आणि प्रशासक बनाव असा संदेश नारायणगड येथील दसरा मेळावा येथून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना दिला.
नारायण गड येथे दसरा निमित्ताने आयोजित दसरा मेळाव्यामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर नारायण गडाचे महंत शिवाजी बाबा महाराज, बंकट स्वामी मठाचे महंत लक्ष्मण बाबा महाराज उपस्थित होते. या मेळाव्याला खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर या अन्य राजकीय मंडळी उपस्थित होते.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले, या गडाचे नाव नगद नारायणगड आहे या अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांना देखील नगद मध्ये मिळावी अशी भावना गडावर व्यक्त करतो.
मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाला आरक्षण दिल्याचं बघायचं होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी मी आणि माझ्या गरीब मराठा समाजाने माझ्या पाठीशी उभा राहून अखेर आरक्षणाची लढाई जिंकली आहे आता मला चिंता नाही. जीवनात येऊन जे मराठा समाजासाठी करायचं होतं ते मी आणि गरीब मराठ्यांनी मिळून घेतली आहे.
माझ्याकडून काही चूक झाली असेल पण मागे हटलो नाही लढणारा मी आणि माझा गरीब मराठा समाज माझ्यासोबत होता आणि पुढेही राहील समाजाच्या रक्ताशी मी गद्दारी कधी केली नाही मागील ४५ वर्षांमध्ये अनेक मराठा समाजाच्या नेत्यांनी पांढरी कपडे घालून मोठ्या मोठ्या गाडीमध्ये फिरवून स्वतःचा अस्तित्व निर्माण केलं पण मराठा समाजासाठी काही दिलं नाही ही खूप मोठी खंत आहे पण या दोन वर्षात मी आणि गरीब मराठ्यांनी एकत्र येऊन संपूर्ण समाजाला आरक्षणा मिळून दिला आहे, असे ही संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
इथून पुढे जे बोलतील त्यांना सोडायचं नाही
राजकीय करियर सोडून नेत्यांनी कोणाच्याही पायाखाली काम करू नये समाजासाठी अशा लोकांपासून दूर राहा आणि एकत्र या. इथून पुढे जे बोलतील त्यांना सोडायचं नाही, असा इशारा संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील यांनी दिला.
आज पासून ओबीसीला दोष देऊ नका
गरीब मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून घेण्याची लढाई आपण जिंकली आहे आता ती टिकून ठेवायची आहे आज पासून ओबीसी समाजाला दोष देऊ नका, ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे तुम्हाला सर्वत्र त्यांनी मदत केली आहे मात्र ओबीसी समाजाच्या नावाखाली नेत्यांकडून बनवाबनवी केली जात आहे ती आता लक्षात आली आहे तुम्ही या नेत्यांपासून सावध राहा, जो नेता जातीवर बोलल त्याला तेवढ्यापुरताच मर्यादित ठेवा.
तो नेता बोलतो म्हणजे समाज बोलत असतो असं नाही त्याला त्याची दाखवा जागा समाजाला विठीस धरू नका असा सल्ला देखील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

