दौंड रेल्वे स्थानक जवळ मालगाडी घसरली.
सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या तीन तास उशिरा धावत आहेत.
सोलापूर
malgadi train derailed in solapur मध्य रेल्वेच्या मुंबई- सोलापूर रेल्वेमार्गावरील दौंड रेल्वे स्थानकाजवळ ५ मार्च रविवारी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी मुंबईकडून सोलापूरच्या दिशेने धावणाऱ्या मालगाडीचे २ डबे दौंड रेल्वे स्थानकाजवळ घसरले. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु, या मार्गावरून सोलापूरच्या दिशेने धावणाऱ्या सर्व गाड्या तीन तास उशिरा धावत आहेत.
मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटाला पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले.यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली. वेळापत्रकानुसार धावत असलेल्या गाड्या जवळच्या स्थानकांत थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना पुढे जाण्यास उशीर झाला आहे.
या अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनासोबतच स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. या मार्गावर घसरलेले डबे बाजूला काढण्याचे काम प्रगतीपथावर करण्यात आले अखेर सायंकाळी आठ वाजून वीस मिनिटाला रुळावरून घसरलेले डबे बाजूला केले.
जागतिक महिला दिनानिमित्त नारी गौरव पुरस्कार वितरण
रेल्वेमार्ग दुरुस्त होण्यास वेळ लागल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक बऱ्याच वेळेसाठी ठप्प राहिली. हा अपघात नेमका कसा झाला, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली. रेल्वेने दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. विविध ठिकाणांहून अधिकारी आणि मदत पथके घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.