majalgaon news माजलगाव धरणातील जाळ्यांनी घेतला दोघांचा बळी

- Advertisement -
- Advertisement -

 

माजलगाव,

majalgaon news माजलगाव धरणात गेल्या अनेक वर्षापासून मासेमारी केली जाते. मासेमारी साठी वापरण्यात येणारे जाळे खराब झाले कि ते धरणात फेकले जाते.हे निकामी झालेल्या जाळ्यांची विल्हेवाट न लावल्याने केडीआरएफच्या जवानाचा मृत्यू झाला. तर पोहताना बुडालेले  डॉ फाफाळ एका मासेमाराच्या गळाला अडकल्याने त्यांचा मृतदेह सापडला.

रविवारी सकाळी माजलगाव धरणावर पोहण्यास गेलेले तेलगाव येथील डॉ . दत्तात्रय श्रीमंतराव फपाळ हे बेपत्ता झाले. दोन दिवस त्यांचा शोध घेतला जात होता. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी शोध कार्य करत होते. त्यांच्या मदतीला कोल्हापूर येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकातील राजशेखर प्रकार मोरे वय ३० रा . कोल्हापूर यांचा मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला.

 

माजलगाव धरणात अनेक वर्षपासून मासेमारी केली जाते. मात्र या मासेमारी वर कोणाचे निर्बंध नाहीत. मासेमारी करण्यासाठी वापरात येणारे जाळे खराब झाल्यास त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असते. मात्र हे जाळे धरणाच्या आजूबाजूला फेकून दिले जाते. त्यासाठी कोणतीही काळजी घेतली जात नाही. परिणामी  हे जाळे धरणाच्या तळाशी जाऊन बसते.

 

 

परिणामी पोहण्यास गेलेली व्यक्ती या मध्ये अडकू शकते. आणि केडीआरएफच्या जवानच्या बाबतीत तेच घडले. पाठीला ऑक्सिजन सिलेंडर असूनही केवळ या जाळ्यात अडकल्याने त्याच्या तोंडावरील मास्क निघाले आणि मृत्यू ओढवला.

तसेच या धरणाच्या काठावर असलेल्या वेड्या बाभळी यांच्यामुळे सर्वत्र या जाळ्यांचे अस्तिव पहावयास मिळते.

 

मोरे आणि त्यांचे सहकारी ऑक्सिजन सिलींडरसह धरणात उतरले होते. त्यापैकी मोरे माशांच्या जाळ्यात अडकले ,त्यांच्या सहकारी याला स्थानिक महिला मच्छीमार हिने ओढून काढले आणि त्यामध्ये ते वाचले तर मोरे यांचा  मृत्यू झाला.

दुपारी दीड वाजता या बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडल्यानंतर सायंकाळी डॉ फाफळ यांचा मृतदेह मिळून आला.

यांचा मृतदेह सायंकाळी पाचच्या सुमारास हाती लागला आहे . येथील मच्छिमारांनी गळ टाकून त्यांचा शोध घेतला असता त्यात त्यांचा मृतदेह हाती लागला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles