कोरोना रूग्णांना महावितरण कर्मचा-यांनी दिले जेवण
आष्टी -प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग शहरासह ग्रामीण भागातही झपाट्याने वाढत असल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्ण व नातेवाईकांना आधार देत आष्टी येथील महावितरणाच्या कर्मचा-यांनी एकञ येत एकवेळेसचे कोव्हीडसेंटरवर जाऊन दिल्याने रूग्णांनी समाधान व्यक्त केले आहे.
आष्टी तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुस-या लाटेने थैमान घातले असून,गावची गाव कोरोना बाधित होत आहेत.आशातच कोरोना बाधितांना व त्यांच्या नातेवाईकांना लाॅकडाऊन असल्याने बाजारातूनही काही आणता येत नसल्याने अष्टी शहरातील आयटीआय येथील कोव्हिड सेंटरवर बुधवार दि.12 रोजी दुपारी महावितरण कंपनी आष्टी येथील कर्मचा-यांनी एकञ येउन एकवेळेचे जेवण दिले.या वेळी महावितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता श्री प्रवीण पवार, सहाय्यक अभियंता श्री दत्तात्रय दसपुते व तालुका आरोग्य अधिकारी नितीन मोरे,मुबिन सय्यद व महावितरण कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
आणखी वाचा:बांधावर खते-बियाणे वाहनाला पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ
आम्ही सर्व कर्मचारी एकञ येऊन अचानक ठरविले की,आपण आज कोव्हीड सेंटरवरील रुग्णांना एकवेळेचे जेवण देण्याचा मानस आमच्या कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता प्रविण पवार यांना बोलून दाखविताच त्यांनीही सहमती दर्शवली व मदत ही केली आज एकवेळेचे जेवण आम्ही दिल्याने आम्हाला समाधान वाटले. -शिवाजी गोरे,कर्मचारी महावितरण आष्टी
[…] […]