महा आवास अभियान 2020-21 राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. 27
maha awas yojana gramin महा आवास अभियान 2020-21 अन्तर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून धुळे दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकांवर सर्वोत्कृष्ट ठरले आहे. त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनामध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हाप व्दितीय क्रमांक आणि वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट जिल्हे ठरले आहेत.
गोंदिया जिल्ह्याने सर्वात जास्त उपक्रमामध्ये पुरस्कार पटकावण्याचा मान संपादन केला आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या महा आवास अभियान 2020-21 चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली आहेत.
राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी महा आवास अभियान– 2020-21 राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अभियानात 5 लाख पेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.
या अभियानामधे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थाना, 10 अभियान उपक्रमांमध्ये अभियान कालावधीत केलेल्या कामाच्या टक्केवारीच्या आधारे एकत्रित गुणांकन करुन पुढीलप्रमाणे महा आवास अभियान पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिली.
maha awas yojana gramin राज्य पुरस्कृत आवास योजना
1) सर्वोत्कृष्ट विभाग : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण* :- कोकण – प्रथम, नागपूर – व्दितीय, नाशिक – तृतीय. *राज्य पुरस्कृत आवास योजना* :- कोकण – प्रथम, नाशिक – व्दितीय, पुणे – तृतीय.
*2) सर्वोत्कृष्ट जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण* :- गोंदिया – प्रथम, धुळे – व्दितीय, ठाणे – तृतीय. *राज्य पुरस्कृत आवास योजना* :- अहमदनगर – प्रथम, रत्नागिरी – व्दितीय, वर्धा – तृतीय.
*3) सर्वोत्कृष्ट तालुके : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण* :- गोरेगाव (जि.गोंदिया) – प्रथम, गगनबावडा (जि.कोल्हापूर) – व्दितीय, अकोले (जि.अहमदनगर)– तृतीय. *राज्य पुरस्कृत आवास योजना* :- सडक अर्जुनी (जि.गोंदिया) – प्रथम, मुक्ताईनगर (जि.जळगाव)- व्दितीय, कागल (जि.कोल्हापूर) – तृतीय.
*4) सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण* :- नाव (जि.सातारा) – प्रथम, वाडोस (जि.सिंधुदुर्ग) – व्दितीय, तडेगाव (जि.गोंदिया) – तृतीय. *राज्य पुरस्कृत आवास योजना* :- अंबावडे (जि.पुणे) – प्रथम, अणाव (जि.सिंधुदुर्ग) – व्दितीय, बोरगाव (जि.चंद्रपूर)– तृतीय.
*5) सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारती : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण* :- करंजेपुल (जि.पुणे) – प्रथम, देर्डे कोऱ्हाळे (जि.अहमदनगर) – व्दितीय, निंभी खुर्द (जि.अकोला) – तृतीय. *राज्य पुरस्कृत आवास योजना* :- चिंचवली (जि.ठाणे)– प्रथम, शिरवली (जि.पुणे)- व्दितीय, अंदूरा (जि.अकोला) – तृतीय.
*6) सर्वोत्कृष्ट गृहसंकुले : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण* :- लोणी (जि.अहमदनगर)– प्रथम, येडोळा (जि.उस्मानाबाद) – व्दितीय, कणकापूर (जि.नाशिक)– तृतीय. *राज्य पुरस्कृत आवास योजना* :- खारेकर्दुणे (जि.अहमदनगर)– प्रथम, अदासी (जि.गोंदिया)- व्दितीय, मुणगे (जि.सिंधुदुर्ग) – तृतीय.
या व्यतिरीक्त, ‘महा आवास अभियान- 2020-21’ मधील विशिष्ट 10 उपक्रमांत संख्यात्मक प्रगतीनुसार उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांना खालीलप्रमाणे ‘महा आवास अभियान विशेष पुरस्कार’पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
*1) सर्वात जास्त भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणारे जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण* :- जळगाव – प्रथम, अमरावती – व्दितीय, अहमदनगर – तृतीय. *राज्य पुरस्कृत आवास योजना* :- गोंदिया – प्रथम, बुलढाणा – व्दितीय, नाशिक – तृतीय.
2) सर्वात जास्त घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे मंजूरी देणारे जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण* :- गोंदिया – प्रथम, भंडारा – व्दितीय, अमरावती – तृतीय. *राज्य पुरस्कृत आवास योजना* :- उस्मानाबाद – प्रथम, नांदेड – व्दितीय, बीड – तृतीय.
3) सर्वात जास्त मंजूर घरकुले पूर्ण करणारे जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण :- गोंदिया – प्रथम, नंदूरबार – व्दितीय, भंडारा – तृतीय. *राज्य पुरस्कृत आवास योजना :- अहमदनगर – प्रथम, चंद्रपूर – व्दितीय, गोंदिया – तृतीय.
4) सर्वात जास्त बहुमजली इमारती उभारणारे जिल्हे : कोल्हापूर – प्रथम, सातारा – व्दितीय, बुलढाणा – तृतीय.
5) सर्वात जास्त गृहसंकुले उभारणारे जिल्हे : वर्धा – प्रथम, सातारा – व्दितीय, गोंदिया – तृतीय.
6) सर्वात जास्त घरकुल मार्ट सुरु करणारे जिल्हे : अमरावती – प्रथम, गोंदिया – व्दितीय, भंडारा – तृतीय.
7) सर्वात जास्त लाभार्थ्यांना वित्तीय संस्थांचे गृहकर्ज मिळवून देणारे जिल्हे* : भंडारा – प्रथम, नांदेड – व्दितीय, सोलापूर – तृतीय.
8) सर्वात जास्त आदर्श घरांची निर्मिती करणारे जिल्हे : औरंगाबाद – प्रथम, सातारा – व्दितीय, नांदेड – तृतीय.
9) सर्वात जास्त कॉर्पोरेट, स्वयंसेवी आणि सहकारी संस्थांचे सहकार्य घेणारे जिल्हे : पालघर – प्रथम, अहमदनगर – व्दितीय, सोलापूर – तृतीय.
10) इतर विशेष उपक्रम* : नाशिक – प्रथम, नागपूर – व्दितीय, सांगली – तृतीय.
हे पुरस्कार वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रमुख उपस्थित करण्याचे नियोजित असून पुरस्कार वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.