मढी येथे दर्शनासाठी चाललेल्या पालखेड येथील चार युवकांचा सिद्धेश्वर मंदिर येथे गोदावरीत बुडून मृत्यू……..
पोहता येत असल्याने सुदैवाने एक युवक बचावला
अहमदनगर
madhi yatra पाथर्डी तालुक्यातील मढी येथे दर्शनासाठी चाललेल्या चार युवकांचा नेवासा तालुक्यातील सिद्धेश्वर मंदिर येथील गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दि.११ मार्च रोजी घडली. यामध्ये सुदैवाने एक युवक पोहता येत असल्याने बचावला आहे.हे चार ही युवक वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील असल्याची माहिती नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर येथे मढी येथे दर्शनासाठी चाललेले पालखेड येथील युवक शंकर परसनाथ घोडके वय २९,बाबासाहेब अशोक गोरे वय ३१,आकाश भागीनाथ गोरे वय १९,नागेश दिलीप गोरे वय १९ हे चालले होते.
helicopter fish problem आणि या माशांना लोक वैतागले,मासेमारीला फटका
टोका सिद्धेश्वर मंदिर येथे आल्यानंतर ते गोदावरीत स्नान करण्यासाठी उतरले त्यात सर्व प्रथम दोन जण उतरले मात्र पोहता येत नसल्याने ते बुडत असल्याचे पाहून इतर तीन जणांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला मात्र यामध्ये पोहता येत नसलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला.
यामध्ये एक जण पोहता येत असल्याने त्याचा जीव वाचला.
या घटनेची खबर वाऱ्यासारखी पोहचल्यानंतर येथील घाटाजवळ बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे हे देखील फौजफाटयासह घटनास्थळी दाखल झाले.यात पट्टीचे पोहणारे टोका व कायगाव येथील युवक उतरले सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास शंकर घोडके व आकाश गोरे यांचे मृतदेह काढण्यात आले.त्यानंतर बाबासाहेब गोरे याचा मृतदेह काढण्यात आला त्यात राहिलेल्या एकाला बाहेर काढण्याचा शोध सुरूच होता.
या घटनेची खबर वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे पोहचताच मृतांचे नातेवाईक मिळेल त्या वाहनांनी घटनास्थळी दाखल झाले.या घटनेने पालखेड गावावर शोककळा पसरली आहे.
मढी येथे नेण्यासाठी कावडीने पाणी घेण्यासाठी हे युवक नदीपात्रात उतरले असल्याने पोहता येत नसल्याने या चार युवकांचा मृत्यू झाला असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. बुडून मृत्यू झालेल्या युवकांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज मोढवे,केदार दादा,पो कॉ संजय माने,अशोक कुदळे,रामचंद्र वैद्य यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले.