खोकरमोहा येथे स्व. गोपीनाथ मुंडे ग्राम सचिवालयाच्या इमारतीचे ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण
बीड ,दि. २६ :– संत भगवान बाबा यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या व संत वामन भाऊंचा पदस्पर्श लागलेल्या खोकरमोहा या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असून यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
खोकरमोहा गावातील स्व. गोपीनाथ मुंडे ग्राम सचिवालयाच्या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर आमदार बाळासाहेब आजबे यासह पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. मुंडे यांनी कोरोना मुळे आठ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर जनतेशी मनमोकळा संवाद साधत असून त्यामुळे भावूक झाल्याची भावना व्यक्त केली.
एखाद्याला भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत, कठीण प्रसंगामध्ये आपण सर्वांनी साथ दिली, आशीर्वाद दिला. मी शब्दात आभार मानू शकत नाही. असे यावेळी बोलताना ना. धनंजय मुंडे म्हणाले.
हेही वाचा:थोरामोठ्यांच्या सत्काराने झाला प्रजासत्ताक दिन साजरा
[…] […]