उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा

- Advertisement -
- Advertisement -

Kartiki ekadashi उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा

पंढरपूर
Kartiki ekadashi महाराष्ट्र सुजलाम सुफलाम् व्हावा हिच मागणी विठ्ठलाच्या चरणी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सध्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तो करित असतांना मंदिर परिसरात काही ठिकाणी भू संपादन करावे लागेल. ते करत असताना बाधित लोकांचे योग्य रितीने पुनर्वसन करण्यात येईल असे ते म्हणाले. पांडुरंगाच्या आशिर्वादाने महापुजेचा मान मिळाला या विषयी देवाचे आभार मानले. लवकरच मंदिर परिसरातील विकास कामे सुरू करु असे फडणवीस यांनी सांगितले. जवळ पास दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा आहे. टप्याटप्याने कामे हाती घेतले जाणार आसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ अमृता फडणवीस, मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे व सौ कलावती साळुंखे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी मुख्य शासकीय महापूजा संपन्न. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित.
कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) या दापत्याची निवड करण्यात आली. यामुळे साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विठ्ठलाची शासकिय महापूजा करता आली आहे.

प्रबोधिनी एकादशी (कार्तिकी) निमित्त सजावट…

प्रबोथिनी एकादशी (कार्तिकी यात्रा) निमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री. नामदेव पायरी श्री. विठ्ठल सभामंडप श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles