ऑनलाईन पूजा आणि दर्शनाने साजरी झाली कानिफनाथांची रंगपंचमी
तिसगाव दि 2 एप्रिल,प्रतिनिधी
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी येथील श्री क्षेत्र कानिफनाथ यांची यात्रा कोरोनाच्या आणि संचारबंदी च्या नियमामुळे रद्द झाली .मात्र भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आली.
दरवर्षी रंगपंचमीला मढी येथे भटक्यांची पंढरी म्हणून अठरा पगड जातीचे भटके लोक जमा होतात.मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली .गर्दीच्या अनुषंगाने कलम 144 लावल्यामुळे भाविकांना इकडे फिरकता आले नाही.कानिफनाथ समाधीची पूजा पुजाऱ्याच्या हस्ते करण्यात आली .अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी दिली.
नाथांच्या समाधीला फुलांनी सजविण्यात आले होते.तर फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला.सुंदर आरास करत नाथांची मूर्तीही सजविण्यात आली होती.कानिफनाथ समाधी सोहळा उत्सवानिमित्त संपूर्ण गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांनी दहाव्या शतकात फाल्गुन वद्य रंगपंचमीच्या दिवशी श्री क्षेञ मढी येथे संजिवनी समाधी घेतली त्यानिमित्त दरवर्षी चतुर्थी व रंगपंचमीच्या दिवशी लाखों नाथभक्त मढी येथे नाथांच्या दर्शनासाठी येत असतात. हजारो मानाच्या काठ्या मंदिराच्या कळसाला लागतात.शिखरावर रेवड्यांची उधळन करतात. नाथसमाधीला गलफ वस्ञ, गुलाबजल -अत्तर ,डवना फुले अर्पण करतात.मलिद्याचा नैवद्य दाखवतात. यादिवशी डफ,ढोल-ताश्यांच्या गजराने व नाथांच्या जयजयकाराने सर्व मंदिर परिसर अगदी दुमदुमुन जातो.या सोहळ्याची मढी ग्रामस्थ व सर्वच नाथभक्त अगदी आतुरतेने वाट पाहतात यावर्षी नाथसमाधी नंतर प्रथमच हा सोहळा कोरोना महामारी मुळे रद्द झाला आहे.
यात्रा साठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भटक्या समाजाच्या लोक कानिफनाथांचे दर्शन घेण्यासाठी येतात .यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी भरणाऱ्या यात्रेला गाढवांचा बाजार भरतो. यंदा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे हा गाढवांचा बाजारही रद्द करण्यात आला.
त्यामुळे यंदाची रंगपंचमी रंगाविना संपली.
तालुका प्रशासन आणि पोलिसांनी मढीकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेट्स बांधून बंद केले होते. वारी पूर्ण करण्यासाठी म्हणून काही भाविक पायी चालत काठी घेऊन आले त्यांनाही मंदिराच्या दिशेने काठी उंचावून कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरावे लागले .संपूर्ण पंचक्रोशीत नीरव शांतता होऊन ग्रामस्थ सुद्धा घरात बसून राहिले .पोलिस निरीक्षक रणजित डेरे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड ,कोषाध्यक्ष बबन मरकड , उपसरपंच रवींद्र आरोळे , विश्वस्त भाऊसाहेब मरकड , श्यामराव मरकड कार्यकारी अधिकारी अशोक पवार व्यवस्थापक बाबासाहेब मरकड ,पोलीस अप्पासाहेब वैदय देवस्थानची सर्व कर्मचारी पोलीस कर्मचारी सर्व बाजुनी लावलेत्या बॅरिकेट्स जवळ थांबून भाविकांना माघारी फिरण्याची विनंती करत होते . यात्रेच्या शेकडो वर्षाच्या इतिहासात प्रथमच गावात जमावबंदीचा आदेश लागू झाल्याने गावकरी सर्व भाविकांनी तीव्र दुःख व्यक्त केले
छायाचित्रे:शिवदास मरकड
आणखी वाचा:आठ दिवसात बीड जिल्ह्यात २४६१ रुग्ण;दररोज होतोय तीनशे पार