एकात्मतेची प्रतीक असणारा श्रीक्षेत्र मढी चा kanifnath madhi yatra उत्सव.
विविध संप्रदाय असणारा महाराष्ट्र हा सर्व उपासना पद्धतींचा आदर करणारा प्रदेश आहे.मग कुणी वारकरी असो कुणी नाथ सांप्रदायिक असो किंवा कोणी आनंद सांप्रदाय. या सर्वांची खास वैशिष्ट्य खास असे वैशिष्ट्य आहे. यांच्या आराध्य देवताही वेगळ्या आहेत. श्रीक्षेत्र मढी हे नाथ साम्प्रदायाकांचे श्रद्धास्थानच.सर्व धर्मातील भक्तांचे उपासना स्थान म्हणून या क्षेत्राचा लौकिक आहे.
सालाबदाप्रमाणे येथील उत्सवाला फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या म्हणजेच होळीच्या दिवसापासून प्रारंभ होतो. या दिवशी देशात सर्वत्र होळी पेटवली जाते, परंतु मढी येथे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला होळीचा सण साजरा करतात.येथील होळीचा पहिला मान गोपाळ समाजाला आहे. भटक्या जातीमधील काळापहाड, लोणारी, माळी, या पोटजातीचे लोक होळीच्या दिवशी एकत्र येतात आणि होळी पेटवतात.rang panchami च्या दिवशी येथे मोठी yatra भरते
होळीच्या सणापासून भटक्या जमातींच्या लोकांची एकत्र येण्यास सुरुवात होते. वर्षभर ही मंडळी गावोगाव भटकत असतात.परंतु यात्रेच्या उत्सवाला न चुकता मढी येथे एकत्र येतात.या ठिकाणी वैदू या भटक्या जमातीच्या लोकांचे न्यायालय म्हणून ओळखले जायचे.या समाजातील लोक एकत्र यायचे आणि इथे मुला मुलींचे विवाह जुळले जात होते, तसेच विधिवत विधी पण पार पाडले जात होते.
समाजाविषयी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो इथेच घेतला जात होता.नवरा बायकोची वाद असतील आपसापसातील भांडण असतील येथेच मिटवली जात असायचे.मात्र काही वर्षांपूर्वी या जातपंचायतींना.विरोध होत असल्यामुळे आता या जात पंचायती.नामशेष झाले आहेत.
या गावात भरतो सर्वात मोठा गाढवांचा बाजार
भटक्या लोकांना एकत्र येण्यास बरोबर सुरुवात झाल्यानंतर ही मंडळी आपल्याबरोबर संपत्ती म्हणजे गाढवे घेऊन येतात. महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील गाढवे या ठिकाणी होळीपासून जमण्यास सुरुवात होते. हे स्थान भटक्यांचे आश्रस्थान असल्यामुळे गाढवांचा देशातील सर्वात मोठा गाढवांचा बाजार या ठिकाणी भरला जातो.या बाजारात काठेवाड पासून तेथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंतच्या विविध प्रकारची गाढवे पहावयास मिळतात .बासू चटर्जी यांच्या आस्था या चित्रपटात येतील जातपंचायतीचे व गाढवांच्या बाजारांची चित्रीकरण करण्यात आले. त्यामुळे हा उत्सव देशातील विविध लोकांपर्यंत पोहोचला गेला.
madhi yatra कानिफनाथ महारा
जांच्या समाधीस्थळी या भटक्या जमातीचा मोठा मान आहे. कानिफनाथांची श्रद्धा समाधी स्थान बांधण्याच्या कामी त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. पूर्वी दंडकारण्य असलेल्या या गर्भगिरी डोंगरांमध्ये नाथांची समाधी बांधण्यासाठी गोपाळ समाजाने खूप मदत केली.कानिफनाथ महाराजांच्या समाधीस्थळी या भटक्या जमातीचा मोठा मान आहे. कानिफनाथांची श्रद्धा समाधी स्थान बांधण्याच्या कामी त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. गडाच्या पायथ्याशी असलेला दगड बांधकामाच्या काळात गडावर नेऊन पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे उत्सवाच्या प्रारंभी होळी पेटवण्याचा या गोपाळ समाजाला असतो.
kanifnath madhi yatra नाथांची काठी
या नाथ संप्रदायाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे नाथांची काठी होय. या उत्सवाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे नाथांची काठी असते.नाथ संप्रदायाचे लोक केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, राज्यात असल्यामुळे तिथून या काठ्या सजवून नाथांच्या दर्शनासाठी मढी येथे आणल्या जातात. फाल्गुन व ते दशमीच्या दिवशी भाविक काठ्यांची आपल्या घरी पूजा करतात.होळीपासून चैत्रपाडव्यापर्यंत ही काठी भाविक गडावर घेऊन येतात. या ठिकाणी काठी गडाच्या कळसाला व समाधीला टेकवली जाते, म्हणजे नाथांच्या समाधीचे दर्शन काठीला दिले जाते .या काठीचा पहिला मान भटक्या समाजातील कैकाडी समाजाला दिला आहे. मंदिर बांधण्यासाठी लागणारा चुना या कैकाडी समाजाने गाढवाच्या पाठीवरून वाहून नेला.त्यामुळे गाढव आणि कैकडी समाज यांना या ठिकाणी महत्त्वाचे स्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील कैकाडी समाज या ठिकाणी उत्सवासाठीी जमा होतो.
सोनारांचाही मान
इतर समाजाप्रमाणेच सोनार समाजालाही महत्त्वाची स्थान आहे. मंदिराचा कळस उजळायचे काम सोनार समाजाला देण्यात आले आहे. मंदिराच्या पितळी कळस फाल्गुन शुद्ध सप्तमीला उतरवला जातो. तो उजळल्यानंतर फाल्गुन शुद्ध दशमीच्या दिवशी पुन्हा चढवला जातो. हे काम गेल्या पिढीपासून प्रल्हाद बाबुराव शिरसागर करत आहे. त्या मोबदल्यात त्यांनी तयार केलेल्या तांब्याचा ताईत कानिफनाथांचे प्रतीक म्हणून देशभरात भाविकांमार्फत पोहोचवला जातो.
या संदर्भात इतिहास असा की यापूर्वी सुमारे चारशे वर्षांपूर्वी पिलाजी गायकवाड हे मराठा सरदार स्वारीवर निघाले असता फिरत फिरत या ठिकाणी आले. त्यावेळी कानिफनाथांचे अस्तित्व एका मठात होते. पाण्यासाठी इतरत्र भटकत असताना कानिफनाथांनी त्यांच्या सैन्याला आग्नेय दिशेला असलेल्या महादेवाच्या मंदिरा नजीक नदीचे जिवंत पाणी दाखवले त्यामुळे गायकवाड तृप्त झाले. पुढे खर्डा येथे झालेल्या युद्धात त्यांनी विजय मिळवला. त्याचबरोबर त्यांनी खर्डा येथे कानिफनाथाच्या मंदिराची स्थापना केली.नाथांच्या इच्छेनुसार त्यांनी या ठिकाणी नाथांची समाधी बांधण्यात आली.
मठापासून ‘मढी’
सध्याची मढी हे नाव पूर्वी असलेल्या नाथांच्या ‘मठा’मुळे पडलेले आहे. मठाच्या अपभ्रंशामुळे या ठिकाणाला लोक मढी म्हणू लागले.या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी गावांमध्ये तीन बारवांची काम केले. साखरी बारव भांडी बारव, आणि गौतमी बारव अशी या तीन बारवांची नावे आहेत. आजही या तीन बारवा या ठिकाणी अस्तित्वात असून त्याचा आकार खूप मोठा आहे.
मंदिराच्या ठिकाणी असणारे शिलालेख जुन्या मराठी आणि उर्दू भाषेत आहेत. यावरून ही मंदिर हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असल्याचे मानले जाते. मुख्य गडाला पूर्व पश्चिम आणि उत्तर या दिशेस दरवाजा आहे या तिन्ही दरवाजांची नावे अनुक्रमे पैठण दरवाजा. चोर दरवाजा आणि मुख्य दरवाजा असे आहे.
पथ्य पाळण्याचा उत्सव.
होळीपासून या यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर पाडव्यापर्यंत येथील लोक विविध पथ्य पाळतात. या महिन्याभरात विविध प्रकारचे धार्मिक उत्सव केले जातात. शेतीची कामे यावेळी बंद ठेवली जातात. घरामध्ये पलंग न उभारणे, दाढी न करने, केस न कापणे, तळलेले पदार्थ न खाणे, अथवा कोणतेही पदार्थ न तळणे, लग्न न जमवणे अशा प्रकारची पथ्य या गावांमध्ये पाळली जातात.
रंगपंचमीला नाथांनी समाधी घेतली असल्यामुळे या दिवशी या ठिकाणी यात्रा भरते. या यात्रेमध्ये कानिफनाथांचा प्रसाद म्हणून येथील प्रसिद्ध ‘रेवडी’ लोक बरोबर नेतात. हा रेवडी व्यवसाय इथे परिसरामध्ये एक महिनाभरापासून चालू असतो. ही रेवडी प्रसादाच्या रूपाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाते.दरवर्षी या यात्रेला देशातून लाखो भाविक येतात त्यांची पाण्याची राहण्याची व्यवस्था ट्रस्टच्या मार्फत करण्यात येते.