jugad vehicle भन्नाट जुगाड;दुचाकी आणि भंगारातुन बनवली चारचाकी टुमदार गाडी :
सांगली,
भंगार आणि दुचाकी साहित्याचा जुगाड desi jugad करत एका अवलियाने चक्क चार चाकी गाडीचे निर्मिती केली आहे. अगदी ऐटीत बसून जाण्या सारख्या ही भन्नाट गाडी रस्त्यावर चालताच सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. दुचाकीचा इंजन आणि जीप गाडीचा ढाचा, असा अफलातून प्रयोग करून ही चारचाकी गाडी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र येथील दत्तात्रय लोहार या अवलियाने बनवली आहे. मुलाने चार चाकी गाडी आपल्याकडे पण पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली, त्यांनतर लोहार यांनी ही अफलातून गाडी बनवली आहे..
दत्तात्रय लोहार यांनी आपल्या फॅब्रिकेशन व्यवसाय आहे. त्यांनी हळूहळू भंगारातील साहित्य गोळा करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे असणाऱ्या दुचाकीचे इंजिन भंगारातील एका जीप गाडीचे साहित्य, रिक्षाचे चाक,त्याच बरोबर इतर साहित्य गोळाकरून सर्व जुगाड why it is called jugad करत दत्तात्रय लोहार यांनी दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर एक भन्नाट चार चाकी गाडी jugad vehicle तयार केली आहे.छोटीशी आणि टुमदार असणारी ही गाडी आता रस्त्यावर धावू लागली आहे. दिसायला अगदी एखाद्या विंटेज (ओल्ड मॉडेल) गाडी प्रमाणे ही गाडी दिसते. नॅनो गाडी पेक्षा ही लोहार यांनी बनवलेली गाडी jugad means in english अगदी छोटी आहे. स्वतःच्या कल्पक डोक्याचा वापर करत दत्तात्रय लोहार यांनी ही चार व्यक्ती बसू शकतील अशी, गाडी बनवली आहे.विशेष म्हणजे या गाडील स्टार्टर नसून पायाने किक मारून चालु होते.याचे स्टेरींग हे डाव्या बाजूला आहे.पेट्रोलवर ही गाडी धावत असून 1 लिटर पेट्रोल मध्ये 40 ते 45 किलोमीटर इतके मायलेज असून ताशी 40 किलोमीटर वेगाने ही गाडी धावते. तर ही गाडी बनवण्यासाठी लोहार यांना 50 ते 60 हजार इतका खर्च आला आहे. jugad vehicle in which state
विमा प्रश्नावर किसान सभे कडून पाठपुरावा
jugad vehicle आनंद महिंद्रकडून लोहार यांना गाडी बोलरो गाडीची ऑफर
Local authorities will sooner or later stop him from plying the vehicle since it flouts regulations. I’ll personally offer him a Bolero in exchange. His creation can be displayed at MahindraResearchValley to inspire us, since ‘resourcefulness’ means doing more with less resources https://t.co/mibZTGjMPp
— anand mahindra (@anandmahindra) December 22, 2021
दुचाकीच्या साहित्या पासून बनवलेल्या दिमाखदार चारचाकी भारतीय जुगाड वाहनाची दखल महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे.त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लोहार यांच्या वाहनाचा व्हिडिओ शेअर केला असून छोटी चारचाकी बनवल्याबद्दल लोहार यांना बोलेरो वाहन ऑफर केले आहे.या वाहनाबद्दल आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले. हे कुठल्याही नियमांमध्ये बसत नाही. पण मी कल्पकतेची प्रशंसा आणि कमीत अधिक या आपल्या लोकांच्या क्षमतेविषयी प्रशंसा करणे कधी सोडणार नाही,असे आनंद महिंद्र आपल्या ट्विटमध्ये नमुद केले आहे.
Nice