नगर दि 17 एप्रिल ,प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्यात 14 दिवसाचा जनता कर्फ्यु
लावण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
यासंदर्भात जिल्हाधिकारी नव्याने आदेश काढणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना चा मोठा विस्फोट झाला आहे.दररोज तीन हजार पेक्षा अधिक रुग्णांची संख्या येत आहे.
अशा परिस्थितीत कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील 14 दिवस अहमदनगर
जिल्ह्यात जनता कर्फ्यु लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपर्क मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. यामध्ये त्यांनी शिर्डी कोपरगाव या ठिकाणी पाहणी
करून प्रशासनाच्या बैठका घेतल्या. त्यानंतर अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात लोकप्रतिनिधी
आणि प्रशासनाची बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार,आमदार निलेश लंके,
जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये हसन
मुश्रीफ यांनी जिल्ह्यात 14 दिवसाचा जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले.तसेच प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन
त्यांनी यावेळी केले. या संदर्भातील नवीन आदेश जिल्हाधिकारी काढणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
bio disel,बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश