Jalna News मुख्यमंत्री जरांगे पाटलांच्या भेटीला आंतरवाली सराटामध्ये
जालना,
Jalna News गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम राहतआंतरवालीत सराटा येथील मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे.सरकारची दूध अनेक वेळा येऊन मनोज जरंगे पाटील यांची समजूत काढली मात्र जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आता थेट मुख्यमंत्रीच जरांगे पाटलांच्या भेटीला आंतरवाली सराटा येथे येत आहेत.
मराठवाड्यातील Maratha reservation,मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठीआंतरवाली सराटा येथे मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून उपोषण सुरूू केले आहे.दरम्यान मनोज जरंगे पाटील यांनी यापूर्वी आंदोलन सुरू केले होते. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरू केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यात वाढता प्रतिसाद पाहता प्रशासनाला ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळता आली नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
मनोज जरंगे पाटील यांना राज्यांमधून विविध ठिकाणाहून प्रतिसाद मिळत आहे.गावागावांमध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलने करण्यात येत आहेत.तर काही गावांमध्ये युवकांनी स्वतःचे मुंडन करून त्यांना पाठिंबा दिला आहे गावागावात शासनाच्या अंतयात्रा काढल्या जात आहेत.शासकीय मालमत्तेचे नुकसानही या आंदोलनामध्ये होत आहे.ही सर्व परिस्थिती प्रशासनाला आणि राज्य सरकारला व्यवस्थितपणे हाताळता आली नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घ्यावे यासाठी सर्वपक्षीयनेत्यांची बैठकी ही दोन दिवसांपूर्वीेण्यात आली.तसेच जरांगे पाटील यांच्यावतीने शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री यांच्यासोबत बैठक केली मात्र यामध्ये कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही.
जरंगे पाटील यांनी शासकीय निर्णयामध्ये दुरुस्ती करण्याच्या सूचना सरकारला दिल्या होत्या मात्र सरकारने या निर्णयामध्ये दुरुस्ती न करता तसाच निर्णय बंद लिफाफ्यात घालून जालन्याची माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासोबत पाठवला होता.
हा लिफाफा सर्वांसमोर उघडून संबंधित जीआर लोकांसमोर वाचून दाखवण्यात आला मात्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती न करण्यात आल्यानेे जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम राहिले.
दरम्यान अनेक सत्ताधारी मंत्र्यांनी येऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला मात्र जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम असल्यामुळे आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटा येथे आज चार वाजता येत आहेत.Maratha aarakshan,
त्यानंतर जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.