Jalna income tax आयकर विभागाच्या छापेमारीत 390 कोटींची मालमत्ता जप्त
जालना
Jalna income tax जालन्यात 3 ऑगस्ट रोजी दिवसांपूर्वी आयकर विभागाने टाकलेल्या छापेमारीत 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोनं अशी एकूण 390 कोटींची बहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागली आहे.आयकर विभागाच्या 300 अधिकाऱ्यांनी जालन्यातील स्टील उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांच्या मालमत्तेवर 5 दिवसांपूर्वी छापेमारी केली होती.या छापेमारी दरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यानी स्टील उद्योजकांच्या कंपन्यांसह घरावर छापे टाकले होते.या छापेमारीतच काही दस्तावेज,32 किलो सोनं,58 कोटी रुपयांची रोख रक्कम अशी एकूण 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागल्यानं खळबळ उडाली आहे.सूंदरलालजी सावजी बँक,एस आरजे पित्ती स्टील,इलेक्ट्रॉनिकस प्रतिष्ठाने,फायनान्सर विमलराज सिंघवी,डीलर प्रदीप बोरा यांच्या घरासह कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली असे समजते.
drone farming in dhule ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा