अकोले
jain diksha जैन धर्मामध्ये दीक्षा घेऊन जीवन त्यागण्याची प्रथा आहे. अनेक कुटुंबातील व्यक्तींनी आणि महिलांनी घर कुटुंब दूर करून दीक्षा घेतल्याचे उदाहरणे आहेत. मात्र अकोले तालुक्यातील राजूर येथील एकाच कुटुंबातील तिघांनी दीक्षा घेतली आहे.
अकोले तालुक्यातील राजूर येथील कीर्तीकुमार रमणिकलाल शहा यांची कन्या, जावई व बारावर्षीय नातवाने संन्यास घेतला आहे. ओहरा कुटुंबातील या तिघांचा दीक्षा समारंभ jain diksha process संगमनेरात ३ मार्च, २०२३ रोजी जैन पद्धतीने पार पडणार आहे.
श्रेणीक ओहरा, निकिता ओहरा व जिनेश ओहरा हे तिघे प्रापंचिक जीवनाचा त्याग करून पुढील आयुष्य संन्यास jain diksha ceremony घेऊन जगणार आहे. एकाचवेळी एकाच कुटुंबातील तिघांनी संन्यास घेण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. यानिमित्ताने या तिघांची वरघोडा मिरवणूक राजूर शहरात मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत ओहरा कुटुंबीयांनी गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. ढोलताशांच्या गजरात ही मिरवणूक पार पडली. याचे नियोजन जैन संघाचे विश्वस्त सुनील शहा, सुधीर ओहरा, शशिकांत ओहरा, प्रकाश शहा यांनी केले होते. तर जैन बांधवांनी मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन चांगलाच ठेका धरला.
मोठ्या रथामधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यापूर्वी त्यांनी जेसीबी मशिनवर तिघांनी आपल्या हातांनी पैसे आणि इतर वस्तू लोकांना दान केले. jainism diksha यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनी जैन दीक्षा घेतली आहे. हे कुटुंब दिगंबर जैन पंथाचे आहे. धर्मासाठी jain dharm diksha त्यांनी संसार त्यागला आणि संन्यास घेतला.