दहावी बारावी च्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्या; मे आणि जून मध्ये होणार
मुंबई दि 12 एप्रिल ,प्रतिनिधी
राज्यातील दहावी बारावी च्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एका ट्विटर संदेशाद्वारे दिली आहे.
कोरोनाची राज्यातील वाढती परिस्थिती पाहता परीक्षा घेणे अवघड असल्याने या परीक्षा मे आणि जून या महिन्यांमध्ये घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी बोर्डाच्या दहावी बारावी च्या परीक्षा घेतल्या जातात.शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवी आणि नववी अकरावी या वर्गाच्या परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि मे महिन्याच्या सुरुवातीला दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. तशा सूचनाही बोर्डाच्या माध्यमातून शाळा महाविद्यालय पर्यंत देण्यात आल्या होत्या.मात्र राज्यांमध्ये कोरोना ची वाढती संख्या पाहता या परीक्षा घेणे शक्य नसल्याचे अनेक लोकप्रतिनिधी मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक प्रतिनिधी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यानंतर या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितलं.इयत्ता 10 वीच्या परीक्षा जून मध्ये आणि 12 वीच्या परीक्षा मे च्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा:बीड जिल्ह्यात गावे बनताहेत कोरोना हॉट स्पॉट
[…] […]