hijab नुरा कुस्ती न खेळता आखाड्यातील कुस्ती खेळावी – ॲड प्रकाश आंबेडकर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

 

औरंगाबाद –

आज औरंगाबादचे आमची सभा रद्द झाली खरं तर आज hijab मुस्कान चा सत्कार आज आयोजित केला होता आम्हाला वाटलं राज्यातील सरकार धर्मनिरपेक्ष आहे.

मात्र सरकारने त्यांच्या कृतीतून सरकार धर्मनिरपेक्ष नसल्याचं दाखवून दिलं, मी पोलीस आयुक्त याना स्वतः बोललो होतो त्यांनी सुरुवातीला आमची अडचण नाही असे सांगितले, परवानगी देणार असे सांगितले मात्र अचानक पोलीस बदलले .

आणि मुस्कान ( हिजाब गर्ल ) च्या घरी कर्नाटकात औरंगाबाद पोलीस गेले आणि मुस्कानला समजावून सांगितले की औरंगाबादला जाऊ नका, पोलिसांनी कदाचित हे पहिल्यांदा असे केले असावे, पोलिसांनी मुस्कानला समजावले आणि भीती सुदधा घातली, आणि नोटीस दिली की परवानगी देण्यात येत नाही.

आज आम्ही औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे, यात आम्ही असे म्हटले की मूलभूत अधिकारात आणि धार्मिक स्वातंत्र्यात ज्याला त्याला जस वागायचे तसा अधिकार आहे फक्त आम्ही इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊ, मुस्लिम महिलांचा पेहराव हा कायद्याचा विषय नाही आणि याबाबत कुणाला आक्षेप असण्याचा प्रश्न नाही.

मी कुठलही समर्थन करत नाही, मात्र भारतातील किती महाविद्यालयात गणवेश आहे असा प्रश्न ॲड प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. न्यायालयाने पुढील सुनावणी २२ तारखेला ठेवली आहे त्यानंतर मुस्कानचा मोठा सत्कार करु असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

 hijab girl

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने चांगली लढत दिली मात्र कॉंग्रेस, बसपा, एमआयएम यामुळे भाजपाचे फावले व विजय मिळाला असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मत व्यक्त करताना हिंदू-मुसलमान राजकारण सुरू आहे. मुसलमानाची दाढी आणि हिंदूची शेंडी अशा रितीने राजकारण सुरू आहे.

जनतेलाही अशाचप्रकारच्या राजकारणात रस आहे. दोष कोणाला देणार, निवडून गेले त्यांना की निवडून दिले त्यांना? मी निवडून दिले त्यांनाच दोष देतो असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

राज्यातील सरकार पडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, तसे संकेतही दिसत आहेत. भाजपला सरकार पाडण्याची गरज नाही, सरकार आपोआप पडेल. आजही नाना पटोले म्हणाले होते, आम्हाला सरकारसोबत जायचे नव्हते.

देवेंद्र फडणवीस नी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखवून सरकारवर गंभीर आरोप केले. मी फडणवीसांना आव्हान देतो की, त्यांनी नुरा कुस्तीचे पैलवान होण्यापेक्षा आखाड्यातील पैलवान व्हावं.

व्हिडिओचे पेनड्राइव्ह अध्यक्षांना देऊन काही उपयोग नाही. त्यांनी ते पेनड्राइव्ह जनतेच्या स्वाधिन करावेत, असे आंबेडकर म्हणाले.

 

COVID-19 Update 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना 16 मार्च पासून मिळणार कोविड लस

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles