Happy maha shivratra 2022 wishes बारा ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील वैजनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मांदियाळी
परळी
Happy maha shivratra 2022 wishes,बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथांचे मंदिर महाशिवरात्रीनिमित्त सज्ज झाले आहे.प्रभू वैद्यनाथ यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे.कोरोना नंतर मोकळीक मिळल्याने परळी येथे भाविक दर्शनासाठी येत आहेत. दर्शनासाठी मध्यरात्री बारा वाजल्यापासून मंदिर खुले करण्यात आले.पहाटे पासून दर्शनासाठी भाविक येत आहेत.
भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे,असे सांगितले जाते . पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभु वैजनाथाच्या दर्शनासाठी मंदीर सज्ज करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्त दरवर्षी येथे लाखो भाविक येतात. दरवर्षीप्रमाने यंदाही मंदीर ट्रस्टच्या भाविकांची काळजी घेत असल्याचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले .
Rashtriya Vayoshri Yojana 2022;दिव्यांग व्यक्तीसाठी स्वतंत्र सशक्त विभाग सुरू
मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.भाविकांची काळजी घेण्यात येत असल्याचे मंदिर देवस्थानचे राजेश देशमुख यांनी सांगितले.
Happy maha shivratra 2022 wishes
दरवर्षी महाशिवरात्री ला येथे यात्रेचे आयोजन करण्यात येते मात्र यंदा कोरोनाच्या दृष्टीने सलग दुसऱ्या वर्षी वैद्यनाथ मंदिराची यात्रा रद्द करण्यात आली आहे.सायंकाळी सात वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मंदिरात प्रभू वैद्यनाथाची महापूजा पार पडणार आहे. भाविकांची होणारी गर्दी पाहता पोलिसांकडून सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे . मंदिर परिसरात 104 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. 20 पोलीस अधिकारी, दीडशे पोलीस कर्मचारी, 100 होमगार्ड आणि आरसीपीची तुकडी तैनात करण्यात आली आहे . मंदिर मध्ये मिळणाऱ्या सुविधामुळे भाविक समाधानी असल्याचे चित्र दिसत आहे.