अहमदनगर
H3N2 Death in Ahmednagar या विषाणूची अहमदनगर जिल्ह्यात एन्ट्री झाली आहे. अहमदनगरजवळील एका खासगी वैदयकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणांचा इन्फ्लूएंझा (H3N2) या विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे.याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे यांनी दिली.
हा डॉ युवक औरंगाबाद येथील रहिवाशी असून तो नगर मधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
त्याची गेल्या काही दिवसापूर्वी या युवकाने अनेक ठिकाणी प्रवास केला असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्याच्यावर अहमदनगर शहरातील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी रात्री 10.30 वाजता त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील हा पहिला बळी आहे.
दरम्यान, मंगळवारी दुपारी मृत्यू झालेल्या युवकाच्या रक्ताचे नमुने इन्फ्लूएंझा बाधित आले असल्याचा खासगी प्रयोग शाळेचा अहवाल मिळाला आणि अहमदनगरच्या आरोग्य खात्यात एकच खळबळ उडाली. दुसरीकडे मयत तरुणाचा कोविडचा अहवाल पॉझिटीव्ह होता. मयत तरूण मागील आठवड्यात अलिबागला पर्यटनासाठी गेला होता. तेथून अहमदनगरला आल्यावर तो आजारी पडला होता.
अहमदनगरमधील मोठया रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करत्या वेळी त्याची प्रकृती गंभीर होती. मयत तरुण मुळचा औरंगाबादचा आहे. कोविड आणि इन्फ्लूएंझामुळे मृत्यू झाल्याने अहमदनगरच्या आरोग्य खात्यात खळबळ उडाली आहे.
इन्फ्लूएंझा संसर्ग टाळण्यासाठी पुन्हा कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. दरम्यान मयत तरूणासोबत आणि संपर्कात आलेल्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.