निवडणूक बिनविरोध करणाऱ्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींना 21 लाखांचा निधी देणार – आ बाळासाहेब आजबे
आष्टी दि 22 डिसेंबर,प्रतिनिधी
आष्टी मतदार संघातील ज्या गावातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होतील अशा गावांना आगामी काळात प्रत्येकी 21 लाखाचा विकास निधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी घोषणा आ बाळासाहेब आजबे यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील आ निलेश लंके , अकोले येथील आ डॉ किरण लहामटे , परभणीचे आ डॉ राहुल पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक विनविरोध करणाऱ्या गावांना 20 ते 25 लाख रुपये विकास निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे , आदर्श ग्राम समितीचे पोपटराव पवार यांनी ही या निर्णयाचे स्वागत केले होते. बीड जिल्ह्यात ही ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत . आष्टी मतदारसंघात 23 ग्रामपंचायत निवडणूक होत आहे . आ बाळासाहेब आजबे यांनी देखील बिनविरोध निवडणूक घेणाऱ्या ग्रामपंचायतींना आगामी पाच वर्षांच्या काळासाठी प्रत्येकी 21 लाख रुपये विकास निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यातील 10 लाखांचा निधी आमदार निधीतून तर 11 लाखांचा निधी कंपनी विकास निधीतून ( सीएसआर फंड ) देण्यात येणार असल्याचे आ .आजबे यांनी सांगितले.
हेही वाचा:भाजपचे माजी खासदार तथा नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल
Keep working ,splendid job! https://www.timaseczki.pl maseczka przeciwwirusowa