अहमदनगर । प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने छोट्या उद्योगांना भरारी देण्याचे काम केले जाते.राज्य सरकारच्या अर्थसहाय्य मधून तयार झालेल्या गोल्ड क्लस्टर ला केंद्र सरकारच्या MSME मध्ये सामील करून घेतले जाणार असल्याचे एम एस एम इ चे संचालक पी एम पार्लेवार यांनी सांगितले.अहमदनगर येथील गोल्ड क्लस्टर ला भेट दिली .तसेच
INDIA GEMS AND JEWELLERY DOMESTIC COUNCIL चे पदाधिकारी राजेश रोकडे यांनीही क्लस्टरला भेट दिली .
अहमदनगर येथे राज्य सरकारच्या अर्थसहाय्यतून गोल्ड क्लस्टर उभे राहिले आहे.राज्य सरकारने यासाठी 5 करोड रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे.हे राज्यातील एकमेव क्लस्टर आहे.या क्लस्टर च्या माध्यमातून जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक यांना सोन्याच्या दागिन्यांची निर्मिती, हॉलमार्क,कास्टिंग रिफायनरी यासारख्या सुविधा मिळत आहेत.या पूर्वी या साठी मुंबई किंवा गुजरात येथे जावे लागत होते.मात्र आता हे सर्व नगरमध्ये मिळत आहे.नगरच्या गोल्ड क्लस्टर चे मार्गदर्शन घेऊन नागपूर येथे क्लस्टर उभारले जात आहे.असे महा औद्योगिक क्लस्टर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश लोळगे यांनी सांगितलं.
आणखी वाचा:संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे औपचारिक प्रस्थान
राज्यात सध्या 27 क्लस्टर असून त्यांची एक महा असोसिएशन तयार करण्यात आली आहे.क्लस्टर ला केंद्र सरकारच्या वतीने 20 करोड रुपयांचे अर्थसहाय्य या क्लस्टर ला दिले जाते.या क्लस्टर च्या माध्यमातून अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला जात असल्याचे लोळगे यांनी सांगितले.