गोदावरी खोऱ्यातील पाणी जायकवाडीकडे झेपावणार

- Advertisement -
- Advertisement -

godavari water crisis गोदावरी खोऱ्यातील पाणी जायकवाडीकडे झेपावणार

अहमदनगर

godavari water crisis मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पामध्ये 65 टक्के पेक्षा कमी पाणीसाठा असल्याने या प्रकल्पात नाशिक आणि नगर  जिल्ह्यातून आज पाणी सोडले जाणार आहे. या संदर्भातील आदेश अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक यांनी दिले आहेत.हे पाणी आज सोडले जाणार आहे.

या आदेशानुसार नगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध धरणातून 8.603 टीएमसी इतके पाणी जायकवाडी धरणासाठी सोडले जाणार आहे. यासंदर्भातील आदेश कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी यापूर्वी दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मुळासमूह, प्रवरासमूह, नाशिक जिल्ह्यातील दारणा समूह आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर समूह या समूहातून हे पाणी सोडले जाणार आहे.
समन्यायी पाणी वाटप धोरणातून हे पाणी सोडले जाणार आहे.
नगर जिल्ह्यातील मुळा धरणातून 2.10 टीएमसी , प्रवरा नदीच्या भंडारदरा , निळवंडे धरण समूहातील 3.36 टीएमसी तर नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या धरण समूहातील 2.70 टीएमसी पाणी असे एकूण 8.6 टीएमसी पाणी देण्याचे या आदेशात म्हटले आहे .
समन्यायी पाणी वाटपाच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जायकवाडीला नगर – नाशिक जिल्ह्यातील धरणातून 31 रोजी पाणी सोडले जाणार आहे.

जायकवाडी धरणात सध्या 45 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. समन्यायी पाणी वाटपा वर चर्चा झालेली आहे . त्यानुसार नगर – नाशिक जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे सह नाशिक जिल्ह्यातील दारणा व अन्य धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश काढले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles