Filmy style stant फिल्मी स्टाईलचा थरार…..धावत्या ट्रॅक्टरमधून धावत्या एसटी बसवर उडी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

फिल्मी स्टाईलचा थरार…..धावत्या ट्रॅक्टरमधून धावत्या एसटी बसवर उडी

बीड

Filmy style stant बीडच्या माजलगाव तालुक्यात एखाद्या हिंदी सिनेमातील नाट्यमय घटनेसारखा थरार घडल्याचा प्रकार समोर आला आहे .माजलगाव – गढी महामार्गावरील शृंगारवाडी फाट्याजवळ, दोन ट्रॉल्या घेऊन भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या एसटी बसवर, ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या युवकाने उडी मारली. यावेळी एसटीच्या डाव्या बाजूला धडकून रोडवर जोरात आदळल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी  सायंकाळच्या दरम्यान घडली. गजानन मारोती बनाईत वय 32 रा. शुक्लतीर्थ लिमगाव ता.माजलगाव असं मयत तरुणाचे नाव आहे

गेवराई तालुक्यातील सिरसदेवीहून 2 ट्रॉल्या असलेले ट्रॅक्टर कोळसा घेऊन माजलगावकडे जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या कल्याण- वसमत बस क्र. एम.एच .20 बी.एल. 4488 ही बस, ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत होती. यादरम्यान ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेल्या गजानन मारोती बनाईत वय 32 रा. शुक्लतीर्थ लिमगाव ता . माजलगाव याने एसटी बसवर उडी मारली.

यावेळी तो एसटी बसच्या डाव्या बाजूला समोरील टायरच्या बाजूला धडकला व रस्त्यावर जोरात आदळला. यामुळं त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून तो जागीच ठार झाला. दरम्यान ट्रॅक्टर फरार झाले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles