महामार्गावरील या पुलाखाली आढळली स्फोटके

- Advertisement -
- Advertisement -

महामार्गावरील या पुलाखाली आढळली स्फोटके.

रायगड
Explosive like device found जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पेण शहरानजीक असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोगवती नदीच्या पुला खालील पात्रात बॉम्ब सदृश्य वस्तु म्हणजे जिवंत जिलेटीन कांड्या निदर्शनास आली आहे.

 

महत्वाचे म्हणजे हा पुल मुंबई आणि कोकण यांना जोडणारा पुल आहे. आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.४८ वाजता सदरील घटना समोर आली आहे.

पेण येथील समाज सेवक स्वरूप घोसाळकर आणि त्यांचे सहकारी मितेश पाटील यांना ही बॉम्ब सदृश्य वस्तु नदी पात्रात दिसून आली त्यांनी तात्काळ पेण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देवेन्द्र पोळ यांना या बाबत माहिती दिली.

या घटनेमुळे पेणमध्ये खळबळ माजली आहे. बाँम्ब शोधक पथक घटना स्थळी दाखल झाले आहे.

पेण येथील नदीपात्रात सापडली स्फोटके सापडली आहेत. या जिवंत जिलेटीन कांड्या असून त्या कोणी नदीपात्रात टाकल्या की त्या नदीच्या प्रवाहात वाहत येथे आल्या याबद्दल पुढील तपास सुरू आहे.

रायगड, नवी मुंबई पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.

तसेच पोलिसांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गा वरील वाहतूक एकेरी मार्गावर सुरू ठेवली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles