माजी आ भिमराव धोंडे यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल बोगस मतदारांची पडताळणी सुरू
आष्टी (प्रतिनिधी )
exmla complaints bogus voters आष्टीत बनावट मतदार नाव नोंदणी होत असल्याची तक्रार माजी आ. भिमराव धोंडे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. याची आयोगाने गांभीर्याने दखल घेतली असून नव्याने नोंद झालेल्या मतदारांपैकी संशयित बोगस वाटणारे मतदारांची पडताळणी सुरू केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी बोगस मतदार नोंदणीबाबत केलेल्या तक्रारीची माहिती घेण्यासाठी व विविध कामांचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयास भेट दिली, वेगवेगळ्या विभागात जाऊन कामाची पाहणी केली. माजी आमदार भिमराव धोंडे यांनी चार दिवसांपूर्वी बनावट मतदार नाव नोंदणी बाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती त्याबाबत तहसिलदार गायकवाड यांना भेटून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आपल्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली असुन तक्रारी प्रमाणे संशयित वाटणाऱ्या व नव्याने नोंद झालेल्या मतदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. काही संशयास्पद नांवे आढळली आहेत.
सर्व मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ( बीएलओ) यांनी या बाबींची खातरजमा करूनच अर्जाची पडताळणी करावी, वरील बाबीकडे दुर्लक्ष झाल्यास व चुकीची मतदार नोंदणी किंवा वगळणी झाल्यास सर्वस्वी बीएलओ जबाबदार राहतील असे तहसीलदार गायकवाड यांनी सांगितले.
माजी आ. भिमराव धोंडे यांनी राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, व तहसीलदार आष्टी यांच्या कडे तक्रार केली होती. तसेच माजी आमदार भीमराव धोंडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत किती अर्ज दाखल झाले आहेत याचीही सविस्तर माहिती घेतली.
तसेच पिक विमा , संजय गांधी निराधार योजना, घरकुल या योजनांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एकुण ३६६६० महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित पात्र असणारी एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे तहसीलदारांना सांगितले. तसेच मतदारसंघातील सर्व पात्र महिलांनी आपापल्या तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फाॅर्म भरण्याचे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे.