जोपर्यंत त्या अधिकाऱ्याला निलंबित करत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन
राजेंद्र जैन ,
आष्टी ,दि 6 मे,
आरोग्य अधिकाऱ्यावर अमानुषपणे केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज आष्टी तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आष्टी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. जोपर्यंत ह्या अधिकाऱ्याला निलंबित केले जात नाही आणि त्यावर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन या आरोग्य कर्मचाऱ्यांनी तहसीलदार राजाभाऊ कदम यांना दिले.
बीड येथून आष्टी कडे येत असताना चराटा फाटा येथे टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल वनवे यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. याच्या निषेधार्थ आष्टी तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. देऊन आज आष्टी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात जमलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्याला निलंबित करावे आणि त्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली तसेच घोषणाही देण्यात आल्या. या अधिकाऱ्याच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. त्यानंतर आष्टी तहसील कार्यालयाचे तहसीलदार या कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
संबंधित निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री माननीय गृहमंत्री माननीय आरोग्य मंत्री यांना पाठवण्यात आले आहेत.
आणखी वाचा:बीड जिल्ह्यात गावागावात कोरोना बेतला;आज जिल्ह्यात 1439