पुण्यामध्ये तरुणीवर झालेल्या हल्ल्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली ही अशी घटना परत होऊ नये मानून चौकात इमरजन्सी बॉक्स बसवले | emargancy box
emargancy box – पुण्यातील भर रोड येथे नुकताच तरुणीवर झालेल्या हल्ल्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात सध्या महिला सुरक्षित नाहीत का? यावरून हा प्रश्न निर्माण होतो. मात्र, रस्त्यावरून चालताना कोणालाही असुरक्षित वाटू नये, यासाठी कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी अंतर्गत मुख्य चौकात आपत्कालीन कॉल बॉक्स बसवण्यात आले आहेत. या कॉल बॉक्सचा उपयोग कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात राहणारे नागरिक करणार आहेत. emargancy box
इमरजन्सी बॉक्स मंजे नेमकं काय
हे खोके महत्त्वाच्या चौकांमध्ये खांबांना जोडलेले आहेत. आपत्कालीन कॉल बॉक्समध्ये एक बटण आहे. त्या भागात कोणतीही घटना घडल्यास खांबावर ठेवलेल्या बॉक्सवरील लाल बटण दाबा. बटण दाबल्यानंतर या संदर्भातील सिग्नल पालिकेतील वॉर रूममध्ये जातो. घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याला तत्काळ माहिती दिल्याने पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचतात. emargancy box
या बॉक्सवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे. त्या बॉक्सखाली उभे राहून बटण दाबल्यावर तुमचा चेहरा पालिकेच्या वॉर रुममध्ये बसलेल्या कर्मचाऱ्यालाही दिसेल आणि तुम्ही आणि तो एकमेकांशी संवाद साधू शकाल, असे स्मार्ट सिटीचे सीईओ प्रल्हाद रोडे यांनी सांगितले. emargancy box
आपत्कालीन कॉल बॉक्स कुठे आहेत?
डोंबिवलीतील मॉडेल इंग्लिश स्कूल, शांतीनगर शाळा- पाथर्ली, मॉडेल कॉलेज बस स्टॉप, नेहरू मैदान- विवेकानंद स्कूल, हनुमान मंदिर- पी अँड टी कॉलनी, मंजुनाथ हायस्कूल, 90 फिट रोड, मोठा गाव गणेश घाट- डोंबिवली पश्चिम, खडकपाडा सर्कल, चक्की नाका, दुर्गाडी किल्ला, गौरी पाडा, काटे मानिवली नाका, प्रेम ऑटो चौक, शिवाजी चौक, शक्ती चौक, बेतुरकर पाडा, टिटवाळा मंदिर चौक, वसंत व्हॅली, विशाल भोईर चौक, मधुसूदन टॉवर, सम्राट चौक, असे प्रकल्प समन्वयक डॉ. सुनील भोसले यांनी दिले. emargancy box