drone delivery in india ड्रोन द्वारे लस पुरवठा
पालघर :
drone delivery in india महाराष्ट्र राज्यात ड्रोन द्वारे लस पुरवठा करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग आज पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्या मध्ये करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागांमध्ये जिथं रस्त्यांची सोय नाही, किंवा वाहने जावू शकत नाहीत, जंगलातून पायवाटेने आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी नागरिकांना मोठी पायपीट करावी लागते त्यामुळे बरेच नागरिक हे लसीकरणासाठी जावू शकत नसल्यानं त्यांचं लसीकरण होवू शकत नाही अशा drone delivery india ठिकाणी लसीचा कमी वेळेत पुरवठा करण्यासाठी आता जिल्ह्यात ड्रोन चा उपयोग करण्यात येणार आहे.
drone delivery in india
जगात वेगवेगळया क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन कामं जलद आणि सुलभरित्या पार पाडली जात आहेत. आता या श्रृंखलेमध्ये महाराष्ट्र राज्यातला पालघर जिल्हा देखील सामील झाला आहे. पालघर जिल्हयातल्या जव्हार मधल्या अतिदुर्गम आणि लांबच्या कार्यक्षेत्रात drone models ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण आणि यशस्वी प्रयोग आज करण्यात आला. हा प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लु इन्फिनीटी इनोवेशन लॅब, आय आय एफ एल फाऊंडेशन आणि रोटरी क्लब च्या मदतीनं राबविण्यात येत आहे.
रेल्वेची साखळी ओढली आणि टेस्टिंग पुढे ढकलली
आज पहिल्यांदा जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियम मधून या ड्रोननं 300 लोकांचं लसीकरण होईल इतक्या लसीची पेटी घेऊन उडाण भरली आणि ती लसीची पेटी 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या झाप प्राथमिक आरोग्य केंद्रात अवघ्या 9 मिनिटांत पोहचवली. झाप आरोग्य केंद्राचं जे अंतर पार करण्यास आरोग्य पथकाला 50- 60 मिनिटं लागतात. तिथं या ड्रोननं केवळ 9 मिनिटांत लसी पोहचवल्या. त्यांनतर त्याठिकाणी लसीची दुसरी मात्रा बाकी असलेल्या 300 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.
त्यामुळे आता ड्रोनच्या Idrone मदतीनं अतिदुर्गम भागात जलद गतीनं लस पोचवता येईल. ज्यामुळे शितसाखळी अबाधीत राहील आणि प्रवासादरम्यान होणा-या वेळेची आणि मनुष्यबळाची बचत होईल. drone delivery in india पुढील काळात केवळ लसचं नव्हे तर ड् अत्यावश्यक औषधे पाठविणे, रक्त पाठविणे, लहान मुलांच्या लसी पाठवणे हे सुद्धा ड्रोन द्वारे drone model करण्यात येणार असल्याची माहिती आयआयएफएल च्या अधिकाऱ्यांनी दिली.