डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलल्या
पदवीचे पेपर ३ मे पासून ‘पदव्युत्तर’च्या परीक्षा ५ मे पासून होणार
औरंगाबाद दि 14 एप्रिल प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए, बीएस्सी व बीकॉमसह अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा दोन मेपर्यंत संस्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच तर अभ्यासक्रमाची परीक्षाही २७ एप्रिलऐवजी पाच मे पासून सुरू होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बी.ए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाची परीक्षा सात एप्रिलपासून सुरळीतपणे सुरु झाली. तर परांपरागत पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्चपासून व ६ एप्रिलपासून अभियांत्रिकीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु होत्या. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने पंधरा दिवस विविध निर्बंध लागू केले आहेत. या संदर्भातची घोषणा मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री केली. या पार्श्वभुमीवर कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश परीक्षा विभागाला दिले आहेत. त्यामुळे १५ ते ३० एप्रिल होणारे सर्व अभ्यासक्रमांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. आता तीन मेपासून उर्वरित पेपर घेण्यात येणार आहेत. तर पदी तर अभ्यासक्रमाची २७ एप्रिल पासून होणारी परीक्षा आता पाच मे पासून सुरू होणार आहे. त्यांनी उर्वरित पेपर जास्तीत ऑनलाईन पद्धतीने द्यावेत, असे आवाहन परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी केले आहे.
आणखी वाचा :कोरोनाच्या रूग्णांना तात्काळ मदत मिळावी म्हणून तहसिलकार्यालयात वार रूमची स्थापना-तहसिलदार