आमदाराच्या मुलासह वर्धा अपघातात सहा युवकांचा मृत्यू

- Advertisement -
- Advertisement -

 

 

वर्धा

Death of six youths in Wardha accident जिल्ह्यातील देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ मेडिकल विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार थेट खाली कोसळली. तब्बल ४० फूट उंचीवरुन विद्यार्थ्यांची कार खाली पडल्याने सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील सर्व मृत विद्यार्थ्यांचं वय २५ ते ३५ च्या दरम्यान आहे . मध्यरात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, अपघातानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्यास सुरुवात केली .

 

वर्धा जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अपघातातील सर्व मृत विद्यार्थ्यांची ओळख अखेर पटली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनाही कळवण्यात आलं असून अपघाताची बातमी ऐकून सातही विद्यार्थ्यांच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महिंद्रा एक्सयूव्ही कारनं बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलेल्या या सर्व मुलांची ओळख पहाटेपर्यंत होऊ शकली नव्हती. दरम्यान, आता अपघातातील सर्वच मुलांची ओळख पटली असून इतरांचीही नावं समोर आली आहेत. यात तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश असल्याचं समोर आलं. तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडालेसह अन्य सहा जण या अपघातात दगावले असून यातील सर्व विद्यार्थी हे महाराष्ट्राबाहेरील असल्याचं कळतंय. सर्व मेडिकलचे विद्यार्थी असून ते एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. वेगवेगळ्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांची कार नदीच्या पुलावरुन चाळीस फूट खोल दरीत कार कोसळून अपघात झाला.

 

 

Death of six youths in Wardha accident अपघातातील मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावं

१) आविष्कार रहांगडाले, आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा

२) नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएस

३) नितेश सिंग, २०१५, इंटर्न एमबीएएस

४) विवेक नंदन २०१८, एमबीएबीएस फायनल पार्ट१

५) प्रत्युश सिंग, २०१७, एमबीबीएस फायनल पार्ट २

६) शुभम जयस्वाल, २०१७, एमबीबीएस फायनल पार्ट २

७) पवन शक्ती, २०२० एमबीबीएस फायनल पार्ट 1

या अपघातानंतर विद्यार्थ्यांचा कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठीही तब्बल चार तासांचा अवधी लागला. यानंतर पोस्टमॉर्टेमसाठी विद्यार्थ्यांचे मृतदेह पाठवण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची ओळखही पटली असून आता विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेनं अपघातातील सर्व मृत तरुणांच्या कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.

नीरज चौहान हा कार चालवत होता. त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान , आता सर्व विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याचीही माहिती सावंगी मेडिकल कॉलेजच्या ओएसडींनी दिली. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. आपला मुलगा भविष्यात डॉक्टर होणार आहे, असं स्वप्न सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिलं होतं. Death of six youths in Wardha accident मात्र सोमवारच्या काळरात्री या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान या अपघातातील सातही विद्यार्थ्यांच्या मृत्यूनं संपूर्ण मेडिकल कॉलेजही हादरुन गेलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles