दसरा मेळावा सावरगाव:जिल्ह्यातून जातीपातीचे राजकारण संपवायचेय

बीड

Dasara melava Dhananjay munde बीड जिल्ह्यामध्ये सध्या जातीपातीचे वातावरण बिघडलेलं आहे अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे मित्र असणारे होते ते आज एकमेकाला बोलत नाहीत हे बीड जिल्ह्यासाठी चांगलं नाही. दसरा निमित्ताने गडाची जी परंपरा सर्व जाती धर्माची आहे तीच जाती परंपरा कायम ठेवण्यासाठी बीड जिल्ह्यात निर्माण झालेले जातीपातीचा द्वेष इथंच संपला पाहिजे बीड जिल्ह्याचे नाव चांगलं झालं पाहिजे येथील सर्व नियम एका सोबत जगलं पाहिजे असा संदेश आ.धनंजय मुंडे यांनी दसरा मेळावा सावरगाव निमित्ताने दिला.

भगवान बाबा यांच्या जन्मभूमी सावरगाव येथे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आमदार धनंजय मुंडे बोलत होते यावेळी व्यासपीठावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे माजी खासदार प्रीतम मुंडे, आमदार नमिता मुंदडा, आमदार मनोज कायंदे, रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार बाळराजे पवार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, सरचिटणीस सर्जेराव तांदळे आधी प्रमुख पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.


माझ्या विरोधात मीडिया ट्रायल झालं त्या काळामध्ये माझी बहीण पंकजा मुंडे यांनी मला खंबीर साथ दिली सांत्वन केलं पाठीशी उभा राहिली त्या प्रकरणात जे न्यायालयात गेले न्यायालयाने देखील तपास करून मला क्लीन चीट दिली मात्र तक्रार देणाऱ्याला दंड भरावा लागला परिणामी मीदेखील त्याचा त्रास सहन करत आहे, आ. मुंडे म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण दिलं ही आनंदाची बाब आहे पण काही जण ठरवून ओबीसी मधून आरक्षण द्यायचं आहे असं बोलून परत द्वेष निर्माण करत आहे.

आता या ताटातलं काढून त्या ताटात होणार नाही मराठा समाजाच्या युवकांसाठी शिक्षण नोकरीसाठी आरक्षण दिलेला आहे हे सरकारचं काम आहे आणि यापुढेही सरकार त्यांना मदत करेल यात काही शंका नाही असेही आमदार धनंजय मुंडे यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं.

सध्या बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक संकट ओढावला आहे. मात्र या अडचणीत देखील दसरा मेळावाची परंपरा खंड होऊ नये शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेण्याचे ठरवलं.

आणि आज हा दसरा मेळावा येथे होत आहे मी मंत्रिमंडळात नाही आमदार आहे पण माझी बहीण पंकजा मुंडे मंत्रिमंडळात आहे तीच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकार करून नुकसान भरपाई ची मदत मिळवून देईल यात शंका नाही असे देखील आमदार मुंडे म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles