आष्टी दि १७ फेब्रुवारी, प्रतिनिधी
आष्टी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित खरीप पीक कर्ज व कर्जमाफीतील शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याबाबत बँकांना आदेशित करावे. या मागणीसाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना भेटून निवेदन दिले.
यावेळी बीड जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग नागरगोजे, अनुरथ सानप, यासीन भाई शेख, संजय शिरसाठ, सरपंच सावता ससाने, अनिल जायभाय, भागवत वारे यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा:अडीच लाखांची लाच घेताना आरोग्य अधिकारी रंगेहात एसीबीच्या जाळ्यात
निवेदनात भीमराव धोंडे यांनी म्हटले आहे की, आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील बँकांकडे अनेक दिवसापासून पीक कर्जासाठी प्रकरणे सादर केले आहेत. मात्र त्यांना अद्याप पर्यंत मंजूरी मिळाली नाही.याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांना बँकांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आणि अरेरावीची भाषा ही केली जाते. तसेच कर्जमाफीतील शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिले गेले नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. प्रत्यक्ष खरीप पीक कर्ज आणि कर्जमाफीतील शेतकरी यांना कर्ज देण्याचे बँकांना आदेशित करण्याचे करण्याची मागणी या निवेदनाद्वारे माजी आमदार भीमराव माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे.