आष्टी दि 7 मे प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात कोविड लस घेण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असून, लस घेण्यासाठी नागरीक जास्त तर
लस कमी पडत असल्यामुळे परिणामी आरोग्य,पोलिस यंञणेवर ताण पडत असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रांवर
लोकसंख्येच्या आधारे पुरेशी कोविड लस उपलब्ध करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित
कुंभार यांच्याकडे आ.धस यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बीड जिल्ह्यात असलेल्या 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांवर
लोकसंख्येच्या आधारे लस पाठवून तेथील नागरीकांना लस द्यावी.लसीकरण नागरीकांना देणे सुरू आहे.परंतु कोविड लस
पुरेशी नसल्याने आरोग्य व पोलिस यंञणेवर ताण पडत आहे..यातून वाद निर्माण होत आहेत.आष्टी तालुक्यातील टाकळसिंग
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतीच जवळपास 64 हजार लोकसंख्या असून,येथे शेकड्याने लस येत असल्याने वाद
विवादाची परिस्थिती निर्माण होत आहे.त्यामुळे अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर सर्वच केंद्रांवर आहे.याबाबत प्रशासानाने
योग्य ती दखल घेऊन लोकसंख्येनुसार लस पुरवठा केला तर हे लसीकरण सुरूळीत होईल यासाठी प्रशासनाने याची दखल
घेण्याची मागणी आ.सुरेश धस यांनी केली आहे.
आणखी वाचा:बीड जिल्ह्यात गावागावात कोरोना बेतला