Court ashti maharashtra आष्टी येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

- Advertisement -
- Advertisement -

Court ashti maharashtra आष्टी येथील दिवाणी, फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

आष्टी,
Court ashti maharashtra आष्टी येथील न्यायालयाची नवीन इमारत पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयाचे  न्यायमूर्ती राजेंद्र गोविंद अवचट यांच्या हस्ते या इमारतीचे उदघाटन होत आहे. यावेळी मा.न्यायमूर्ती  रवींद्र मधुसूदन जोशी उपस्थित असणार आहेत.

अशी माहिती  दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग आष्टी श्रीमती पूजादेवी ग. इनामदार,आणि आष्टी वकील संघाचे अध्यक्ष महादेव स.तांदळे यांनी दिली.

ashti beed court आष्टी येथील निजाम राजवटीतील जुनी इमारत कालबाह्य झाल्याने त्याजागी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. ही नवीन इमारत अनेक सुविधांनी युक्त असून या ठिकाणी  न्यायालयीन कामकाजासाठी तीन भव्य दालने बांधण्यात आहे आहेत. वकील संघासाठी एक स्वतंत्र मोठे दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या इमारतीच्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून असे सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेल्या या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ दिनांक २ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता
मा. न्यायमूर्ती राजेंद्र गोविंद अवचट, उच्च न्यायालय मुंबई यांच्या शुभहस्ते होणार असून… याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.न्यायमूर्ती  रवींद्र मधुसूदन जोशी,उच्च न्यायालय मुंबई हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी  बीड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.आनंद लक्ष्मीचंद यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles