बीड दि 11 एप्रिल ,प्रतिनिधी
गावागावात दडलेला सुप्त कोरोना आता बाहेर पडू लागला आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यात गावे कोरोना हॉट स्पॉट बनत आहेत.आष्टी तालुक्यातील घुमरीपिंपरी, कासारी,मुर्षदपूर ही गावे कोरोना हॉट स्पॉट म्हणून पुढे येत आहेत.गावागावात टेस्ट करण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यातील विविध गावे कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहेत.जिल्ह्यातील कोरोना चाचण्या प्रशासनाने सुरू केल्यानंतर सुप्त कोरोना बाधित पुढे येऊ येऊ लागली आहेत.बीड जिल्ह्यातील जिल्हा कारागृह, अंबाजोगाई येथील मेडिकल परिसर, जिल्हा रुग्णालय येथे सातत्याने कोरोना बाधित आढळून येत आहेत.
ऊस तोडणी कामगार गेल्या दोन महिन्यांपासून गावाकडे परतत आहेत.लग्न, छोट्या छोट्या कार्यक्रमातून कोरोना पसरत आहे.गावातील नागरिकांच्या टेस्ट न केल्यामुळे तो सुप्त अवस्थेत पसरत असताना दिसत आहे.प्रतिकारक शक्ती चांगली असल्याने अनेक व्यक्ती मध्ये कोरोनाचे लक्षणे दिसत नाहीत.मात्र त्यामुळे कमजोर प्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना त्याची बाधा होत आहे.त्यासाठी गावागावात टेस्ट व्हायला हव्यात.
आष्टी तालुक्यात मुर्षदपूर, कासारी, कडा, आष्टी,घुमरी पिंपरी धानोरा ,डोंगरगण,जामगाव, खडकत, यासह गावागावात कोरोना जाउन पोहचला आहे.
गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यात दिड हजार कोरोना बाधित आढळून आले आहेत.त्यापैकी आज 1062 आढळून आले.तर 444 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला.
बीड जिल्ह्यातील कोरोना हॉट स्पॉट मध्ये 1062
अंबाजोगाई 223 आष्टी 193 बीड 220,धारूर 30, गेवराई 64,माजलगाव 34 केज 106, परळी 75 ,पाटोदा 53 शिरूर 45,वडवणी 19 अशा एकूण 1062 रुग्णांची आज नोंद झाली.
जिल्ह्यातील एकूण बाधित: 32240
एकूण मृत्यू :709
एकूण कोरोना मुक्त:28126
आणखी वाचा:देवराई येथे दोन तरुणांचा बुडून मृत्यू