जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले कोविड केअर सेंटरकार्यान्वित

- Advertisement -
- Advertisement -

 

 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळण्याचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर दि २ मार्च ,प्रतिनिधी
अद्यापही कोरोनाचा धोका संपला नसल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. घराबाहेर पडताना चेहर्‍यास

मास्क बांधावा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. घरातील वृद्ध, आजारी आणि लहान मुलांची काळजी घ्यावी, असे

आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. विशेषता शहरी भागात नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र

आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशा प्रकारची कृती नागरिकांनी टाळावी. स्वताच्या आणि इतरांच्या

आरोग्याची काळजी घ्यावी आणि प्रशासन घेत असलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत कोविड केअर सेंटर सुरु करण्यासंदर्भातील सर्व आवश्यक तयारी करण्याच्या

सूचना त्यांनी सर्व तहसीलदारांना तसेच महानगरपालिका यंत्रणेला दिल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या निकट संपर्कातील

नागरिकांच्या तात्काळ चाचण्या करण्याच्या सूचना त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक

घेतली. यावेळी त्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास

अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य

कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे,

निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.

संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल

बोरगे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. लांघी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

डॉ. वीरेंद्र बडदे आदींची उपस्थिती होती.

कोरोना रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करणार

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने

वाढताना दिसत आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या पूर्वकाळजीविषयक सूचना आणि प्रतिबंधात्मक

आदेशाचे पालन काही जणांकडून होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत भर पडताना दिसत आहे. त्यामुळे

जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा रात्रीच्या वेळेस अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या

आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहर्‍यावर मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले असून आता दंडाची रक्कमही

पाचशे रुपये इतकी करण्यात आली आहे. याशिवाय, शासकीय कार्यालयात आता मास्क नाही-प्रवेश नाही, याची कार्यवाही

केली जाणार आहे. त्याचबरोबर मास्क न घालणार्‍यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती

त्यांनी दिली.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात त्यासाठीची यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत आजच्या

बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यांनी त्यांच्या क्षेत्रात कोविड केअर सेंटर सुरु करण्यासंदर्भातील सर्व तयारी दोन दिवसात

पूर्ण करावेत. एखाद्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव आला तर त्याच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या तात्काळ आरटीपीसीआर

चाचण्या कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिल्या. कोविड केअर सेंटरप्रमाणेच कोविड हेल्थ

केअर सेंटर कार्यान्वित करण्यासाठीची सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे ते म्हणाले.

आणखी वाचा :राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीज तोडणी विरोधात आमदार राम सातपुते यांचे विधानसभेबाहेर आंदोलन

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी आता सज्ज झाले पाहिजे. नागरिक कोरोना संदर्भातील आरोग्यविषयक

प्रोटोकॉलचे पालन करतील, यासंदर्भात योग्य ती दक्षता सर्व अनुषंगिक यंत्रणांनी घ्यावी. नागरिकांनीही सर्व नियमांचे पालन

करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात

होण्यासाठी यंत्रणांनी कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री, पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी

अधिकार्‍यांना मास्कचा वापर टाळणार्‍यांविरोधात दंडात्मक कार्यवाही मोठ्या प्रमाणात करण्याच्या सूचना केल्या.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच आरोग्य अधिकारी यांचे

म्हणणे ऐकून घेतले. स्थानिक पातळीवर काही अडचणी येत असतील तर समन्वयाने त्याचे तात्काळ निराकरण करुन

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना त्यांनी दिल्या. ***I

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles