कॅव्हलरी फेटरनीटी मेमेंटोचे बनले कॅव्हलरी शिल्प;नगरच्या वैभवात भर
नगर / मनोज सातपुते
कॅव्हलरी मेमेंटो म्हणजे एक स्मृतीचिन्ह. या मेमेंटोची भव्य शिल्पकृती तयार झाली आहे.अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याच्या बाजूला हे शिल्प बसविण्यात आले आहे.या शिल्पाने अहमदनगरच्या वैभवात भर घातली असून प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांचे चिरंजीव शुभंकर कांबळे यांनी हे शिल्प साकारले आहे.
अहमदनगर शहराची ओळख ऐतिहासिक वास्तूसोबत शिल्पांचे शहर म्हणून निर्माण होत आहे.त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडत आहे. शहराच्या मध्यभागी असलेला भुईकोट किल्ला हा नगरला येणाऱ्या पर्यटकांना खुणावत असतो.याच किल्ल्याच्या बाजूला त्रिकोणी जागेवर आर्मड कॉर्प सेंटर आणि शांतीकुमार फिरोदिया मेमोरिअल फौंडेशन मदतीने स्पिरीट ऑफ आर्मर पार्क उभे रहात आहे. या पार्क मध्ये कॅव्हलरी फेटरनीटी शिल्प उभा राहिले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ह्या शिल्पाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल ए.एस. क्लेर यांच्या हस्ते आणि मेजर जनरल एस झा यांच्या उपस्थितीत होत आहे.यावेळी शांतीकुमार फिरोदिया मेमोरिअल फौंडेशनच्या अध्यक्षा आशा फिरोदिया, नरेंद्र फिरोदिया उपस्थित असणार आहेत.
काय आहे कॅव्हलरी फेटरनीटी मेमेंटो ते कॅव्हलरी शिल्पाची कुळकथा!
सन १९६५ मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेल्या युद्धात आर्मड कोर चा मोठा सहभाग होता.या युद्धात भारताने पाकिस्तानला पराभूत करून त्यांचे पॅटन रणगाडे उध्वस्त करून टाकले.याच शौर्याचे प्रतिक म्हणजेच कॅव्हलरी फेटरनीटी मेमेंटो होय.
या मेमेंटो संदर्भात माहिती देताना शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी सांगितले कि, “१९६५ च्या युद्धात आर्मड कोरच्या जवानांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल, सहभागी जवानांना सन्मानित केले जाणार होते.त्यासाठी मेमेंटो तयार करण्याची जबाबदारी तत्कालीन आर्म्ड कोर चे जनरल शंकरन आणि ब्रिगेडियर रंधावा यांनी माझ्यावर टाकली होती, हे मेमेंटो कसे असले पाहिजे यासाठी मी शोध घ्यायला सुरुवात केली.मेमेंटो हे युनिक व्हायला हवे यासाठी मी त्यांनी दिलेल्या भारत पाकिस्तान युद्धाचे फोटो असलेले पुस्तक त्यांनी मला दिले.यातील फोटो चाळत असताना मला एक फोटो क्लिक झाला. वाळू मध्ये रुतलेला आणि उद्धवस्त झालेल्या रणगाड्या समोर भारतीय सैनिक उभे होते.या फोटोवरून कल्पना सुचली कि याचे सुंदर मेमेंटो बनू शकते.मी माझी कल्पना ब्रिगेडियर रंधावा आणि जनरल शंकरन यांच्यासमोर मांडली.”
मातीचे मॉडेल तयार करत असताना ब्रिगेडियर रंधावा आणि जनरल शंकरन हे माझ्या स्टुडीओ मध्ये आले. मेमेंटोचे मॉडेल त्यांना खूप आवडले.त्या मॉडेलचे बारकावे तपासून ते मॉडेल आर्मीच्या मंजुरीसाठी विमानाने दिल्लीला पाठविण्यात आले. विशेष म्हणजे दोन अधिकारी हे मातीचे मॉडेल हातात घेऊन दिल्लीला गेले होते. तत्कालीन आर्मीच्या अधिकार्यांना ते खूप भावले. आणि आजही आर्मी मध्ये याच मेमेंटोचा वापर जवानांना गौरविण्यासाठी केला जातो.”
काय आहे कॅव्हलरी फेटरनीटी मेमेंटो
या मेमेंटोचे वैशिष्टे म्हणजे पराभूत पाकिस्तानचा अर्धवट जळालेला आणि वाळूत रुतलेला पॅटन रणगाडा. या रणगाड्याच्या टॅंक शु वर पाय दिलेला रुबाबदार सैनिक कि,ज्याच्या हातात बायनाक्युलर आहे.या मॉडेल चे बारकावे अतिशय प्रभावीपणे दाखविण्यात आल्याने हे मॉडेल युनिक तयार झाले.
याबाबत अधिक माहिती देताना कांबळे यांनी सांगितले की,विशिष्ट नक्षी असलेला टॅंकशु ही पॅटन रणगाड्याची ओळख आहे .त्यासाठी मी खास फोटोग्राफर घेऊन आर्मेड कोर सेंटर मध्ये गेलो त्याचे फोटो घेतले आणि बारकावे शोधून मांडण्याचा प्रयत्न केला.याच बाजूला बोगी व्हील,स्पराऊट, टॉप रुलर बाजूला पडल्याचे हुबेहूब दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.कोणतीही कलाकृती छोटी मोठी असे नसते तिला तितक्याच खुबीने काम करावे लागते तरच त्यामध्ये जिवंतपणा येतो आणि शिल्प ही बोलू लागतात”.
शिल्पकार प्रमोद कांबळे यांचे चिरंजीव शुभंकर याने हे भव्य शिल्प साकारले आहे. वडिलांनी तयार केलेल्या मेमेंटोचे रुपांतर आता भव्य शिल्पात झाले आहे.
हेही वाचा:कड्याच्या जैन जिमखाना कडाने राज्यस्तरीय बास्केटबॉल चषक जिंकला
[…] हेही वाचा:कॅव्हलरी फेटरनीटी मेमेंटोच… […]