burhanagar devi trust बुऱ्हाणनगर येथील तुळजाभावानी मंदिर ट्रस्ट स्थापन करण्याच्या पुणे येथील धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाला जिल्हा सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी शनिवारी स्थगिती दिली, अशी माहिती ॲड. विजय भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुऱ्हाणनगर येथील तुळजाभावानी मंदिर ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय पुणे येथील धर्मादाय आयुक्तांनी दिला होता. या निर्णयाविरोधात भगत कुटुंबीयांनी येथील जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर दि.२४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होऊन धर्मदाय आयुक्तांचा निर्णय न्यायालयाने कायम केला होता. त्यावर याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करायची. असल्याने निकालाचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा तोपर्यंत या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी अर्जाद्वारे जिल्हा न्यायालयाकडे करण्यात आली होती. या अर्जावर सुनावणी होऊन जिल्हा न्यायालयाने ट्रस्ट स्थापनेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मंदिर गावकऱ्यांकडे सुपूर्त करण्याचा निर्णय जिल्हा न्यायालयाने दिल्याची माहिती वकिलांकडून देण्यात आली. परंतु, असा कुठलाही निर्णय झालेला नाही, असे असताना चुकीची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली असे ॲड. भगत म्हणाले.बुऱ्हाणनगर यांनी दिली यावेळी राजेंद्र भगत, ॲड किरण भगत, सुभाष भगत,कुणाल भगत,रोहन
भगत,संकेत भगत आदी भगत कुटुंबीय उपस्थित होते.
burhanagar devi trust बुऱ्हाणनगर जगदंबा तुळजाभवानी देवी मंदिर देव्हरा हा भगत कुटुंबीयांचाच
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -