बुलढाणा
Buldhana news Rajmata jijau jayanti 2025 जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यातील राष्ट्रमाता जिजाऊंच जन्मस्थळ सूर्योदयाच्या वेळी जिजाऊ माँ साहेबाची शासकीय महापूजा करण्यात आली.
केंद्रीय आयुष आरोग्य व कुंटुब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक राष्ट्रमाता जिजाऊंची पूजाअर्चा केली. यावेळी राजे लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव उपस्थित होते त्यानंतर आमदार मनोज कायदे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनीसुद्धा राजमाता जिजाऊंना अभिवादन केले .
त्यानंतर राज्यभरातुन आलेल्या जिजाऊ भक्तांनी राजमाता जिजाऊना अभिवादन करत जय जिजाऊ जय शिवरायचे नारा दिले त्यामुळे राजे लखोजी जाधव यांचा राजवाड़ा दणाणुन गेला होता राजमाता जिजाऊनां अभिवादन करण्यासाठी काही युवक राजे छत्रपत्री शिवाजी महाराजाच्या वेशभुषेत आले होते.
Read More : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींवर मोक्का
तर महीला आणि पुरूषांनी सुद्धा भगवे फेटे परिधान केले होते यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करुन जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला सकाळीच राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर जिजाउ भक्तांनी अभिवादन करण्यासाठी रिघ लावली. तर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.