परीक्षेला जाताय हे लक्षात ठेवा,घ्यावयाची काळजी
board exam राज्य सरकारने राज्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेत. या संदर्भात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना नुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे आवश्यक असल्याचे जाहीर केले आहे.board exam tips महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
board exam 2023 class 12 यापूर्वी परीक्षेला उशीर झाला तर त्या विद्यार्थ्याला परीक्षा दालनामध्ये प्रवेश दिला जाई. मात्र हा नियम बोर्डाने बदलला आहे.
सकाळच्या सत्रातील परीक्षेला सकाळी 10.30 वाजता उपस्थित असणे गरजेचे आहे.
तर दुपारच्या सत्रातील परीक्षेला दुपारी 2.30 वाजता उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे.
यावेळी या अर्धा तासात विद्यार्थ्यांची केली जाणार आहे. परीक्षेला असणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेरून कोणताही त्रास होणार नाही यासाठी पोलीस बंदोबस्त असणार आहे.
या पूर्वी प्रश्नपत्रिका 10 मिनिटे अगोदर दिली जायची मात्र आता हे 10 मिनिटे शेवटच्या टप्प्यात देण्यात आला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका ही वेळेवर म्हणजेच ठीक 11 वाजता दिली जाणार आहे.
यासंदर्भातील सूचना बोर्डाने सर्व केंद्र संचालकाला दिल्या आहेत. board exam 2023 class 10,
कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी बोर्डाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.
परीक्षेला जाताना घरातून विद्यार्थ्यांनी 1 तास अगोदर निघून प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहावे.
जाताना आपले परीक्षेचे प्रवेशपत्र जवळ ठेवावे. त्याचे झेरोक्स काढून ठेवली पाहिजे.
आपल्या दप्तरात कॉपी पूरक सामान नाही याची खात्री करावी.
आपल्या जवळ पेपर साठी लागणारे साहित्य,पेन पेन्सिल आणि रबर शार्पनर हे बरोबर ठेवावे.अतिरिक्त पेन सोबत असणे आवश्यक आहे.
तसेच वेळेसाठी घड्याळ असायला पाहिजे .ज्या मध्ये आपण वेळेचे नियोजन करता येऊ शकते.
परीक्षा दालनात जाताना कोणतेही इलेक्ट्रानिक वस्तू नेता येणार नाहीत. डीजीटल वस्तूंना पण बंदी असल्याने मोबाईल, डिजिटल घड्याळ,ब्लूटूथ हेडसेट हे जवळ बाळगता येणार नाही.
board exam preparation tips विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना जेवण करून जा. शाररीक आणि मानसिक स्थिती चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. आनंदी राहा.