आष्टी (प्रतिनिधी)
Beed Suresh Dhas allegations on munde बीड जिल्हा नियोजन समिती निधीतील सन 2021-2022 या कालावधीमध्ये परळी आणि अंबाजोगाई तालुक्यांमध्ये रस्ता कामांवर 73 कोटी 36 लाख रुपयांची बोगस बिले काम न करता उचलण्यात आली आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीडचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री तथा नियोजन व वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ही माहिती सुपूर्द करणार असून बीड जिल्ह्यातील विकास निधी वाटपामध्ये झालेला असमतोल दूर व्हावा आणि तात्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील हा बोगस बिलांचा घोटाळा असून त्याची चौकशी करण्याची मागणी आपण करणार आहोत असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.
. आष्टी येथील निवासस्थानी आयोजित विशेष पत्रकार परिषदे मध्ये ते बोलत होते.ते म्हणाले,जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन-2021-22 मध्ये परळी आणि अंबाजोगाई या तालुक्यातील बीड जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता रद्द केलेल्या 57 कामांचे एकूण 14 कोटी 43 लक्ष 45 हजार रुपयांची बिले काम न करता काढण्यात आलेली आहेत.
त्याचबरोबर दि.31/ 12/ 2021 ते 31/3/2022 या कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र.2 बीड, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई,
या कार्यालयांतर्गत एकूण 37 कोटी 70 लक्ष रू किमतीची बिले काम न करता उचलण्यात आली आहेत .
पुढे बोलतांना ते म्हणाले जिल्हा नियोजन समिती सन-2020 मध्ये परळी आणि अंबाजोगाई या तालुक्यातील कामांची प्रशासकीय मान्यता तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी रद्द केली असूनही या सर्व कामांची बिले आपल्या मर्जीतील सार्वजनिक बांधकाम परळीचे उपअभियंता संजय मुंडे यांच्याकडे प्रभारी कार्यकारी अभियंता या पदाचा कार्यभार दि.25 जून 2022 रोजी सोपवून 30/12/2021 रोजीच्या 2 कोटी 21 लक्ष दि.18/3/2022 रोजीच्या 10 कोटी 98 लक्ष, दि.25/3/2022 6 कोटी 59 लक्ष,
दि.26/3/2022 16 कोटी 48 लक्ष,तर दि.31/3/2022 रोजीचे 1कोटी 34 लक्ष असे एकूण 37 कोटी 70 लक्ष रूपायांचा घोटाळा तात्कालीन पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या मतदारसंघात झाला आहे.
ही माहिती आजच्या पहिल्यांदाच जिल्हानियोजन समितीची बैठक होणार असून त्यामध्ये पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करणार असल्याचे आ.धस यांनी सांगितल्या त्याचबरोबर माझ्या घरातील सदस्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याच्या प्रकरणी हे प्रकरण किरकोळ आहे. असे खुळे नावाच्या महिला अधिकारी आहे.ज्यांना वाल्मिक अण्णांनी फोन केला होता.
याचा मिडीयाने तपास करावं. असे आवाहन करून ते पुढे म्हणाले की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे घरच्यांशी फारसा संबंध न ठेवणारा असून अनेक वेळा गुन्हे करून फरार होण्याची त्याची पद्धत आहे काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून ही माहिती मला मिळाली आहे पोलीसांकडून माहिती घेतली.
तो गरिब कुटुंबातील आहे आहे,त्यावर अनेक गुन्हे आहेत.सौरभ भोंडवे याचा बुडून मृत्यू झाला आहे परंतु त्याच्या वडिलांनी हा खून झालेला आहे अशी तक्रार देऊन देखील तत्कालीन पाटोदा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार यांनी घेतलेली नाही कारण त्यांची नेमणूक आकाने केलेली होती.
त्यामुळे सौरभ भोंडवे यांच्या अकस्मान मृत्यू प्रकरणाची देखील चौकशीची मागणी आपण करणार आहोत असे सांगत सुरेश धस पुढे म्हणाले की सर्व बांधकाम विभाग अंबाजोगाई अंतर्गत रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम सन 2021- 2022 अंतर्गत जानेवारी 2023 मध्ये कोणत्याही रस्त्यावर काम न करता दि.13/12 /2021 रोजी 9 कामांचे 15 कोटी रुपये आणि दि.18/2/2022 रोजी एक कामाचे 1कोटी 20 लाख रुपये असे एकूण 16 कोटी 20 लक्ष रुपयांची बोगस बिले तत्कालीन कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी यांचे कालावधीमध्ये उचलण्यात आली आहेत
त्याचबरोबर बजेट अर्थसंकल्पीय कामांमधील हायब्रीड ॲन्यूटी अंतर्गत मंजूर असलेले आणि सध्या सुरू असलेले 59 कोटी रुपयांचे रस्ता काम सुरू असून याच रस्ता कामावर 6 कोटी 30 लाख रुपयाचे आणखी एक काम मंजूर करून काम केल्याचे दाखवून
परळी-पूस- बर्दापूर या रस्ता कामावर 5 कोटी रुपये काम न करता उचलण्यात आले आहेत
हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाची क्षेत्रीय कार्यालयाचे तपासणी वेळी लक्षात येऊन त्यांनी या कामात द्विरुक्ती झाली म्हणजेच एक काम दोन वेळा मंजूर करून त्यातील पाच कोटी रुपयांची बिले उचलण्यात आले आहेत असे पत्र कक्षअधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय यांनी दि.17/3/2022 रोजी दिले आहे
अशा प्रकारे बीड जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण 73 कोटी 36 लाख रुपयांचे रस्ते विशेषतः रस्ते कामांमध्ये बोगस बिले उचलण्यात आली आहेत ही सर्व कामे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील आहेत ही विशेष बाब आहे असेही आ.सुरेश धस यांनी सांगितले आणि या सर्व घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करणार आहोत असेही त्यांनी शेवटी सांगितले
राज्याचे मुख्यमंत्री तालुक्याच्या दौऱ्यावर
भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्याच्या दौरा करणार आहेत.आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ तलावाच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे.या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस विविध विभागाचा आढावा घेणार आहेत.त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ देवस्थानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा होणार असल्याचे आ.धस यांनी सांगितले.