बीड,
स्वच्छतेचे काम महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी शालेय जीवनातच लागतात. म्हणून चांगल्या सवयी लावण्याचे काम शिक्षकांनी करावे. स्वच्छतेची सवय शालेय जीवनापासूनच लागावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे केले.
beed shala swachta abhiyan जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील 38 शाळांना beed school स्वच्छ विद्यालय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी
कार्यालययेथे आयोजित या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीकांत कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी अजय बहिर,विस्तारअधिकारी तुकाराम पवार, विस्तार अधिकारी ऋषिकेश शेळके, रंगनाथ राऊत आदि उपस्थित होते.
साईबाबा संस्थान चे विश्वस्त मंडळ बरखास्त | आघाडी सरकारला उच्च न्यायालयाचा दणका
स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळालेल्या शाळांचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, शाळा व शालेय
परिसर स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाने घ्यावी. तसेच, गाव स्वच्छतेची जबाबदारी सामूहिक घ्यावी. यावर्षी कमी गुणांकन मिळालेल्या शाळांनी अधिक प्रयत्न करावेत व पुढील वर्षी सर्व शाळांनी पंचतारांकित शाळांमध्ये
समावेश व्हावा, यासाठी निकषपूर्ती करावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ( beed shahar )
केंद्र शासनाच्या वतीने 2015-16 पासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. पुरस्कारासाठी ग्रामीण व
शहरी भागातील शासकीय (जिल्हा परिषद), अनुदानित, खाजगी शाळा पात्र असून, यासाठी जिल्ह्यातील 3 हजार 685 शाळांपैकी 3 हजार 637 शाळांनी ऑनलाईन नामांकन सादर केले होते. त्यापैकी 2 हजार 870 शाळा पात्र ठरल्या. पैकी
2 हजार 827 शाळांचे शिक्षण विभागाकडून मूल्यांकन करण्यात आले. पिण्याचे पाणी, शौचालय, साबणाने हात धुणे, ऑपरेशन आणि देखभाल, क्षमता बांधणी आणि कोविड 19 तयारी आणि प्रतिसाद हे मूल्यांकनाचे सहा निकष होते.
पुरस्कारासाठी राष्ट्रीय पातळीवर 46, राज्य पातळीवर 26 व जिल्हा पातळीवर 38 शाळा पुरस्कारासाठी पात्र ठरल्या. त्यांना आज सन्मानित करण्यात आले.
बहुप्रतीक्षित आष्टी नगर रेल्वेचे 23 सप्टेबरला उद्घाटन
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. आभार रंगनाथ राऊत यांनी मानले. सूत्रसंचालन बाळासाहेब तळेकर यांनी केले.