बीड
Beed bank news महाराष्ट्र शासनाने नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी “महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत ५० हजार रूपये अनुदान खात्यावर जमा करण्यात येते मात्र बँकेतील आधिकारी यांनी संगनमतानेच परस्पर पैसे उचलुन शेतक-यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व संबधित शेतक-यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
याबाबत चे सविस्तर वृत्त असे की, जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखा ता.जि.बीड या बँकेतील मौजे. गोलंग्री ता.जि.बीड येथील खातेदार शिवाजी प्रल्हाद कवडे,लक्ष्मण प्रल्हाद कवडे,बाळु दगडु पवार,वृंदावणी बाबासाहेब कदम,सुरेश बारीकराव कवडे यांच्या खात्यातमधुन महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेंतर्गत खात्यावर ५० हजार रूपये जमा झाल्याचे मोबाईल वर मेसेज आले होते.
परंतु यांच्या खात्यावरून परस्पर प्रत्येकी २५ हजार रूपये अनुदान अज्ञात व्यक्तिने उचलल्याचे उघडकीस आले असून याविषयी बॅकेत विचारणा केल्यावर मॅनेजर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर या बाबत संबंधित शेतकऱ्यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे.
Beed bank news रॅकेटची शक्यता;सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा:- डाॅ.गणेश ढवळे
जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेमध्ये अनागोंदी कारभार असुन याबद्दल शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असुन अशा प्रकारचा अपहार अनेक गावांत घडला असण्याची शक्यता असुन त्याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.