आष्टी
ashti lumpy skin disease राज्य सरकारने लम्पी आजाराने मृत्यू झालेल्या जनावरांच्या पशु पालकास मदत देण्याचे ठरविले असून आष्टी तालुक्यात आतापर्यंत ५३ पशुपालकाना मदत मिळाली असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ मंगेश ढेरे यांनी दिली.
आष्टी तालुक्यातील १२२ गावे लम्पी आजाराने बाधित झाले आहेत. या गावामधील गायी, बैल आणि वासरू यांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत १०० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. आष्टी तालुक्यातून लम्पी आजाराच्या मदतीसाठी २७३ प्रस्ताव पाठविण्यात आले असून त्यातील ५३ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये गायी साठी ३० हजार, बैलांसाठी 25 हजार आणि वासरू साठी १६ हजारांची मदत देण्यात येते.