खिळद येथील 52 शेड गावरान कोंबड्याचा मृत्यू
कडा दि 25 जानेवारी, प्रतिनिधी
कड्यापासून 10 किमी अंतरावर असलेल्या खिळद येथील गावरान कोंबडी शेड मधील 52 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली. या संदर्भात शेड मालकाने पशुसंवर्धन विभागाला कळविल्यानंतर या कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली अशी माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ मंगेश ढेरे यांनी दिली.
खिळद येथील तुषार नानभाऊ गर्जे यांच्या शेतात कोंबड्याचे शेड असून त्यामध्ये 500 कोंबड्या आहेत .या कोंबड्यांची वाढ 47 दिवसाची असून दि 24 रोजी यातील काही कोंबड्या मृत झाल्याचे त्यानं आढळून आले .त्यांनी बर्ड फ्लू च्या शंकेने पशुसंवर्धन विभागाला कळविले .पशुसंवर्धन विभागाचे डॉ तुराळे, डॉ साबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या शेडला भेट देऊन मृत कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.या कोंबड्यांचा मृत्यू हा नेमका कशाने झाला तो पोस्टमार्टेम अहवाल आल्यानंतर कळेल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान हा मृत्यू बर्ड फ्लू ने झाला नसल्याचे स्पष्ट असून त्यामुळे त्याचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले नसल्याचे ढेरे यांनी सांगितले.
हेही वाचा:आष्टी तालुक्यातील ‘या’ मुलांचा होणार पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सन्मान