वडिलांच्या विजयासाठी मुलगा प्रचारात

  • आष्टी
  • आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ युवा नेते अजयदादा धोंडे व अभयराजे धोंडे हे प्रचारासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आष्टी तालुक्यात झंजावती दौरा सुरू केला आहे. दौऱ्याच्या निमित्ताने त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.

  • माजी आमदार व विकास पुरुष, रस्ते महर्षी, शिक्षण महर्षी अशा उपाधी असलेले व त्या उपाधी प्रमाणे मतदारसंघात विकास कामे केलेले माजी आ. भीमराव धोंडे हे लोकआग्रहास्तव निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहेत. मतदारसंघात दिवसेंदिवस त्यांना पाठिंबा वाढत चालला आहे. प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आष्टी येथे प्रचंड अशी जाहीर सभा झाली होती, त्या सभेतच त्यांचा विजय निश्चित झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे. त्यांना ” शिट्टी ” हे चिन्ह मिळाले आहे.
  • शिट्टी हे चिन्ह गावोगावी आणि घराघरात पोहोचले आहे. विविध ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत अजयदादा धोंडे यांनी सांगितले की, धोंडे साहेबांनी मतदारसंघात प्रचंड अशी विकास कामे केलेली आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. आष्टी ते दिल्ली व आष्टी ते मुंबई असे पायी मोर्चे काढले होते. उर्वरित विकास करण्यासाठी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहेत.
  • तरी येत्या २० तारखेला शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन अजयदादा धोंडे यांनी केले. टाकळी (अमिया), निमगाव बोडखा या परिसराचा दौरा केला तसेच अभयराजे धोंडे यांनी धानोरा व केरुळ परिसरातील गावांचा दौरा केला असून त्यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे विविध ठिकाणी वाटप करण्यात आले. प्रत्येक गावात प्रमुख कार्यकर्ते बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles