मतदानाच्या प्रचारासाठी उमेदवारांचे कुटुंबीय बांधावर

- Advertisement -
- Advertisement -

आष्टी

ashti assembly election Candidates’ families at the farm for poll campaign आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांचे चिरंजीव अभयराजे धोंडे हे प्रचार करण्यासाठी गावोगाव फिरत आहेत.

कसलाही उन्हातान्हाचा विचार न करता सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत गावाचे दौरे करीत आहेत. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी शिट्टी चिन्हाबाबत माहिती देत आहेत तसेच आम्हाला मतदान करून सेवा करण्याची संधी देण्याची आवाहन ते करीत आहेत.

ashti assembly election Candidates' families at the farm for poll campaign

मतदारांच्या नतमस्तक होत आहेत सर्वांना नम्रपणे आवाहन करणे त्यांची एक मतदारसंघात वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. सुरडी नागतळा परिसरात त्यांनी शुक्रवारी दौरा केला या ठिकाणी एका शेतात महिला कांदा लागवड करीत होत्या. थेट वाफ्यातील पाण्यात जाऊन चिखलात उभे राहून महिला भगिनी‌ मतदारांना मतपत्रिका नमूना दाखवत शिट्टी चिन्हाबाबत सांगून मतदान करण्याचे आवाहन केले.

माजी आमदार भीमराव धोंडे यांचे अख्खे कुटुंबच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. कुटुंबातील सर्व सदस्य मतदारांना विनम्रपणे शिट्टी चिन्हाबाबत माहिती सांगत आहेत.

अभयराजे धोंडे हे प्रत्येक मतदाराला नम्रपूर्वक नमस्कार करणे, दोन्ही हात जोडून विनम्रता निर्माण करणे तसेच वृद्धांच्या नतमस्तक होणे. तरुणांची गळा भेट घेणे अशा त्यांच्या सुज्ञपणामुळे मतदार संघात चर्चेचा विषय बनले आहेत. अभयराजे धोंडे यांनी आत्तापर्यंत आष्टी तालुका पिंजून काढला असून, अभयराजे यांचे या सुज्ञपणाचा आणि विनम्रपणाचा माजी आमदार व अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना निश्चित मताच्या रूपाने फायदा होईल अशी चर्चा मतदारसंघात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles